तोंडातून निघणारा शब्द बाणासारखा गेला पाहिजे - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:20 AM2019-02-27T11:20:35+5:302019-02-27T11:23:00+5:30

'आपल्या तोंडातून निघणारा शब्द, योग्य ठिकाणी बाणासारखा गेला पाहिजे. आपली वानी इंप्रेसिव्ह असो किंवा नसो. मात्र, इंस्पायरिंग असली पाहिजे.'

PM Narendra Modi addresses at 'National Youth Festival 2019' in Delhi | तोंडातून निघणारा शब्द बाणासारखा गेला पाहिजे - नरेंद्र मोदी 

तोंडातून निघणारा शब्द बाणासारखा गेला पाहिजे - नरेंद्र मोदी 

Next
ठळक मुद्दे'माझ्यासमोर आज नव्या भारताचे नवे चित्र पाहायला मिळत आहे''तरुणांची उर्जा नव्या भारताची ओळख बनली आहे''आपल्या तोंडातून निघणारा शब्द, योग्य ठिकाणी बाणासारखा गेला पाहिजे. आपली वानी इंप्रेसिव्ह असो किंवा नसो. मात्र, इंस्पायरिंग असली पाहिजे.'

नवी दिल्ली :  माझ्यासमोर आज नव्या भारताचे नवे चित्र पाहायला मिळत आहे. तरुणांची उर्जा नव्या भारताची ओळख बनली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये बुधवारी युवा संसद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. या सोहळ्याला अनेक युवांसह केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड व अन्य मंडळी उपस्थित होती.

युवा संसद सोहळ्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी युवांना संबोधित करताना म्हणाले, 'माझ्या समोस सध्या न्यू इंडिया उपस्थित आहे. माझ्यासमोर आज नव्या भारताचे नवे चित्र पाहायला मिळत आहे. तरुणांची उर्जा नव्या भारताची ओखळ बनली आहे. आपल्या देशात आणि समाजात जर अशी युवा पिढी तयार होत असेल. तर समाजाचे अनेक मुद्दे योग्य पद्धतीने समजून आपले म्हणणे मांडण्याची भूमिका ही युवा पिढी  करु शकेल.'


याचबरोबर, नरेंद्र मोदी म्हणाले, 'आपल्या तोंडातून निघणारा शब्द, योग्य ठिकाणी बाणासारखा गेला पाहिजे. आपली वानी इंप्रेसिव्ह असो किंवा नसो. मात्र, इंस्पायरिंग असली पाहिजे.' तसेच, युवा संसदेसाठी अनेक कल्पना तुम्ही सूचवा. यासाठी विभागाच्यावतीने ऑनलाइनच्या माध्यमातून सूचना मागवण्याची व्यवस्था करा, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 











 

Web Title: PM Narendra Modi addresses at 'National Youth Festival 2019' in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.