दहशत, हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रीय सहभाग: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:05 PM2021-02-19T16:05:06+5:302021-02-19T16:07:16+5:30
जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.
कोलकाता : जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधाननरेंद्र मोदी सहभागी झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (pm narendra modi addresses visva bharati university convocation ceremony)
विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला आमंत्रित केले, याबाबत खूपच आनंद होत आहे. कोरोना संकटामुळे प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहता आले असते, तर आणखीन छान झाले असते. परंतु, कोरोना नियमांमुळे या सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित झालो आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
What you do depends on whether your mindset is positive or negative. There is scope for both of them. The path is open for both of them. It is in our hands to decide if we want to be a part of the problem or the solution: PM at convocation ceremony of Visva-Bharati University, WB https://t.co/7QSf8sXOJn
— ANI (@ANI) February 19, 2021
भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी नवीन शिक्षण धोरण
देशामध्ये लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी उत्तम आहे. शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. तुमची विचारसरणी तुम्हाला एखाद्या समस्येचे निराकरण करणारे व्हायचं की समस्येचा भाग व्हायचे हे ठरवते, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
गुन्हेगाराचे वय पाहून कारवाई करायची का; अमित शहा यांचा विरोधकांना सवाल
शिक्षणासोबत विचारसरणी महत्त्वाची
जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णालयांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम करत लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटणारेही आहेत. तुम्ही कोणत्या विचारसरणीचा अवलंब करता हे महत्त्वाचे ठरते. विचार करताना सकारात्मक विचार करता की नकारात्मक यावर तुमचे काम कसे होईल हे ठरते. तुम्हाला दोन्ही पर्याय खुले असतात, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारताच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करू शकता
तुम्ही केवळ एका विद्यापीठाचा भाग नसून, एका परंपरेचा भाग आहात हे कायम लक्षात ठेवावे. गुरुदेवांनी विश्व भारती विद्यापीठ असे नामकरण करण्यामागे विशेष उद्देश होता. या विद्यापीठातून जी व्यक्ती शिक्षण घेऊन बाहेर पडले, ती भारत आणि भारतीयत्वाबाबत नवीन दृष्टी जगाला देईल, अशी अपेक्षा गुरुदेव यांना होती. भ्रम, त्याग आणि आनंद या मूल्यांवर आधारित या विद्यापीठात भारताच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.