PM मोदींची मोठी घोषणा! आता १६ जानेवारी ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा केला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 02:10 PM2022-01-15T14:10:39+5:302022-01-15T14:11:33+5:30

इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ वरून ४६ व्या क्रमांकावर आला आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

pm narendra modi announced that 16 january to be celebrated as national start up day | PM मोदींची मोठी घोषणा! आता १६ जानेवारी ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा केला जाणार

PM मोदींची मोठी घोषणा! आता १६ जानेवारी ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा केला जाणार

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतातील स्टार्ट अपची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. यासह या स्टार्टअप्सना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्टार्टअप कल्चर तयार करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून आता १६ जानेवारी हा दिवस नॅशनल स्टार्ट-अप डे म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्ट-अपशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच इनोव्हेशनबाबतचे आकर्षण निर्माण करणे आणि इनोव्हेशनलला इन्स्टिट्यूशनलाइज करणे हा आमचा प्रयत्न आहे. जवळपास ९ हजारांहून अधिक अटल टिकरिंग लॅब्समधून शाळेत इनोव्हेट करणे, नव्या कल्पना निर्माण करण्यासाठी संधी देण्यात येत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

या दशकाला भारताचा techade

या दशकाला भारताचा techade म्हटले जात आहे. या दशकात इनोव्हेशन, इंटरप्रेन्यूरशीप आणि स्टार्ट-अप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. त्याचे तीन महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्यट्ये म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्सपासून मुक्त करणे होय. दुसरे म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणे आणि तिसरे म्हणजे तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

२८ हजाराहून अधिक पेटंट्सला मंजुरी 

गेल्या वर्षी २८ हजारांहून अधिक पेटंट्सला मंजुरी देण्यात आली आहे. तर २०२०-२१ मध्ये अडीच लाखाहून अधिक ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर १६ हजारांच्याही पुढे कॉपीराइट्सला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा अधिक आहे. इनोव्हेशनबाबत देशात मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सममध्ये भारताची रँकिंग सुधारली आहे. २०१५ मध्ये या रँकिंगमध्ये भारत ८१ व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ४६ व्या क्रमांकावर आला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
 

Web Title: pm narendra modi announced that 16 january to be celebrated as national start up day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.