...जेव्हा PM मोदींनी हाती घेतली अत्याधुनिक गन; शत्रुच्या ड्रोनला क्षणार्धात नेस्तनाबूत करण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 09:22 PM2022-10-20T21:22:02+5:302022-10-20T21:23:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिफेन्स एक्स्पो-२०२२ मध्ये उपस्थिती लावली. यावेळी मोदींनी एक अत्याधुनिक बंदुक हाती घेतली आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेतली.

pm narendra modi anti drone gun dronaam | ...जेव्हा PM मोदींनी हाती घेतली अत्याधुनिक गन; शत्रुच्या ड्रोनला क्षणार्धात नेस्तनाबूत करण्याची क्षमता

...जेव्हा PM मोदींनी हाती घेतली अत्याधुनिक गन; शत्रुच्या ड्रोनला क्षणार्धात नेस्तनाबूत करण्याची क्षमता

googlenewsNext

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिफेन्स एक्स्पो-२०२२ मध्ये उपस्थिती लावली. यावेळी मोदींनी एक अत्याधुनिक बंदुक हाती घेतली आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेतली. ही बंदुक सर्वसामान्य बंदुकीसारखी नाही. या बंदुकीला कोणतही नळकांडं नाही. ही ड्रोनचा मागोवा घेणारी आणि क्षणार्धात शत्रुच्या ड्रोनला खाली पाडण्याची क्षमता ठेवणारी अत्याधुनिक गन आहे. याच वैशिष्ट्यामुळे मोदींनी आज खासकरुन या गनची माहिती जाणून घेतली. 

गुरूत्व सिस्टम (Gurutvaa Systems) कंपनीनं ही गन तयार केली आहे. या गनचं नाव ड्रोनम (Dronaam) असं आहे. ही गन एक काऊंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टम आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या गनला अँटी-ड्रोन गन असं संबोधता येईल. ड्रोनम एक स्टेट-ऑफ-द-आर्ट मॉड्युलर सिस्टम आहे. जी घुसखोरी करणाऱ्या शत्रुच्या ड्रोनचा खात्मा करू शकते. या सिस्टममध्ये ओमनी-डायरेक्शनल कव्हरेजची सुविधा आहे. 

अँटी ड्रोन गनच्या माध्यमातून शत्रुच्या ड्रोनचे, जीएनएसएस, कंट्रोल, व्हिडिओ किंवा टेलिमेट्री सिग्नल जाम करता येतात. पाकिस्तानच्या सीमेतून भारतीय सीमेत ड्रोनची घुसखोरी केल्याच्या बातम्या आपण वाचतो. भारतीय हद्दीत शेजारीत देशांचे ड्रोन येऊन रेकी करत असल्याचंही आपण वाचलं आहे. बहुतांश वेळी भारतीय सैन्याकडून शत्रु राष्ट्राचे ड्रोन पाडले जातात. आता अशा ड्रोन्सना तात्काळ पाडता येणार आहे. 

कोणतेही अँटी ड्रोन गन दोन पद्धतीत काम करत असतात. पहिली पद्धत म्हणजे सॉफ्ट स्किल (Soft Skill). यात ड्रोनचा त्याच्या वापरकर्त्याशी संपर्क तोडला जातो. त्याची सिग्नल यंत्रणा जाम केली जातो. यामुळे ड्रोन दिशाहीन होऊन खाली पडतो. दुसरी पद्धत म्हणजे हार्ड किल (Hard Kill) यात काऊंटर ड्रोन सिस्टमच्या रेंजमध्ये ड्रोन येताच त्यावर लेझर सिस्टमने हल्ला केला जातो आणि ड्रोनची इलेक्ट्रॉनिक सिस्टम खराब झाल्यामुळे तो खाली कोसळतो. कोणत्याही स्फोटाविना ड्रोन खाली पाडला जातो. 

Web Title: pm narendra modi anti drone gun dronaam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.