Coronavirus: कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 01:30 PM2021-07-15T13:30:50+5:302021-07-15T13:32:05+5:30

Coronavirus: कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे कौतुक करण्यात आले आहे.

pm narendra modi appreciates uttar pradesh yogi adityanath over corona control | Coronavirus: कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

Coronavirus: कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच महाराष्ट्रातही कठोर निर्बंध कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्यांना निर्बंध लावण्याबाबतचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे. यातच आता कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे कौतुक करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत योगी आदित्यनाथ यांची पाठ थोपटली असल्याची माहिती मिळाली आहे. (pm narendra modi appreciates uttar pradesh yogi adityanath over corona control)

रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

देशातील दुसऱ्या लाटेतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तरीही निर्बंध कमी करण्याला राज्य किंवा केंद्र तयार नाही. यातच तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, यातच आता कोरोना नियंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे कौतुक केले असून, योगी सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे म्हटले आहे. 

देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

ही खूप मोठी सेवा आहे

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना नियंत्रणाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. काशीतील माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, कोरोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटे आली. कोरोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसह संपूर्ण उत्तर प्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य

माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. गुन्हेगारांना समजले आहे की, ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे. यूपी सरकार विकासवादावर चालत आहे. आता येथे जनतेच्या योजनांचा फायदा थेट जनतेला मिळत आहे. 
 

Web Title: pm narendra modi appreciates uttar pradesh yogi adityanath over corona control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.