PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:35 AM2024-05-30T10:35:31+5:302024-05-30T10:39:06+5:30
माध्यमांतील वृत्तांनुसार, पीएम मोदी सर्वप्रथम तिरुअनंतपुरमला पोहोचतील आणि तेथून एमआय-१७ हेलीकॉप्टरने कन्याकुमारीला जातील. ते तेथे साधारणपणे सायंकाळी ४:३५ वाजता पोहोचतील. ते तेथील सूर्यास्त बघतील आणि नतंर ध्यानाला बसतील. यानंतर, ततते १ जूनला दुपारी ३:३० वाजता कन्याकुमारीहून परततील.
लोकसभा निवडणुकीची रणधुमारी आज शांत होणार आहे. आज आखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ४५ तासांच्या ध्यानासाठी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जातील. येथे त्यांच्या कार्यक्रमासंदर्भात जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या ध्यान-धारणेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी आणि संरक्षण संस्था तैनात करण्यात येणार आहेत.
निर्धारित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान मोदी ३० मेच्या सायंकाळपासून १ जूनच्या सायंकाळपर्यंत तेथे ध्यान करतील. हे दोन दिवस पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तेथे जाण्याची परवानगी नसेल. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तेथे पोहोचतील. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँडिंगची चाचणीही घेण्यात आली आहे.
असा असेल संपूर्ण कार्यक्रम
माध्यमांतील वृत्तांनुसार, पीएम मोदी सर्वप्रथम तिरुअनंतपुरमला पोहोचतील आणि तेथून एमआय-१७ हेलीकॉप्टरने कन्याकुमारीला जातील. ते तेथे साधारणपणे सायंकाळी ४:३५ वाजता पोहोचतील. ते तेथील सूर्यास्त बघतील आणि नतंर ध्यानाला बसतील. यानंतर, ततते १ जूनला दुपारी ३:३० वाजता कन्याकुमारीहून परततील.
विवेकानंद रॉकच का? -
असे मानले जाते की स्वामी विवेकानंदांना येथेच दिव्य ज्ञान प्राप्त झाली होते, यामुळे हे ठिकाण पंतप्रधान मोदींच्या ध्यानासाठी निवडण्यात आले आहे. एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींनी ध्यानासाठी निवडलेल्या या खडकाचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आणि एखाद्या भिक्षुच्या जीवनात गौतम बुद्धांच्या सारनाथ प्रमाणेच या ठिकाणाचेही महत्व आहे. विवेकानंद संपूर्ण देशाचे भ्रमण करून येथे पोहोचले, तीन दिवस ध्यानधारणा केली आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते.