बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:19 AM2019-03-25T07:19:55+5:302019-03-25T07:20:52+5:30

'बालाकोटमधले 300 फोन दिसतात, पण पुलवामातील 50 किलो आरडीएक्स दिसत नाही'

PM narendra Modi ate beef biryani and slept during Pulwama attack says aimim chief Asaduddin Owaisi | बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

googlenewsNext

हैदराबाद: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्यावेळी बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का, असा सवाल त्यांनी मोदींना विचारला. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसी मोदी सरकारवर बरसले. त्यावेळी त्यांनी सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत सरकारवर तोफ डागली. त्यांनी हैदराबादमध्ये एका बैठकीला संबोधित केलं. 

'भारतीय हवाई दलानं बालाकोटवर बॉम्ब टाकले. त्यात 250 दहशतवादी मारले गेले, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार एनटीआरपीनं त्या भागात 300 मोबाईल फोन सक्रीय असल्याची माहिती दिली होती. तुम्हाला बालाकोटमध्ये सक्रीय असलेले 300 फोन दिसतात. पण पुलवामात तुमच्या नाकाखालून आणण्यात आलेलं 50 किलो आरडीएक्स दिसत नाही,' अशा शब्दांमध्ये ओवेसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 

पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदी आणि राजनाथ सिंह काय करत होते? बीफ बिर्यानी खाऊन झोपले होते का?, असे सवाल करत ओवेसींनी टीकेची झोड उठवली. माझी लढाई सांप्रदायिक शक्तींविरोधात आहे. देशातील धर्मनिरपेक्षता आणि बंधुभाव संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात माझा संघर्ष आहे, असं ओवेसी म्हणाले. काँग्रेस आणि भाजपामध्ये अजिबात फरक नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं. 

असदुद्दीन ओवेसी हैदराबादमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. सलग चौथ्यांदा ते हैदराबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील. हा मतदारसंघ एमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. तीन दशकांहून अधिक कालावधीपासून हा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सलाहुद्दीन ओवेसी यांनी सलग सहावेळा (1984 ते 2004) या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर ओवेसी सलग तीनवेळा इथून निवडून आले. 

Web Title: PM narendra Modi ate beef biryani and slept during Pulwama attack says aimim chief Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.