नोटाबंदीमुळेच सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 02:18 PM2018-11-12T14:18:40+5:302018-11-12T14:20:05+5:30

नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.

pm narendra modi attacks gandhi family on demonetization chhattisgarh assembly election | नोटाबंदीमुळेच सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत- मोदी

नोटाबंदीमुळेच सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत- मोदी

Next

बिलासपूर- नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. आता त्यालाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. छत्तीसगडमधल्या मतदानाच्या दुस-या टप्प्यादरम्यान मोदींनी रॅली काढली होती. यावेळी त्यांनी गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी पैशांची हेराफेरी करून जामिनावर बाहेर फिरत आहेत. ते मोदींना निर्दोषत्वाचं प्रमाणपत्र देणार आहात का?, नोटाबंदीमुळे बोगस कंपन्या बंद झाल्या. त्यामुळेच तुम्हाला जामिनावर बाहेर पडता आले. सरकारं आधीही होती, परंतु इतर सरकारांच्या तुलनेत तुम्ही एवढं जास्त काम कसे करता, असे जनता मला विचारत असते. मोदी सरकार एवढा पैसा कुठून आणते, परंतु मी जनतेला सांगू इच्छितो की, हे तुमचेच पैसे आहेत. हे पैसे कोणाच्या तरी बिछान्याखाली लपलेले होते. तर कोणाच्या बोचक्यात बांधलेले होते. नोटाबंदीमुळे या सर्व पैशाला बाहेर यावं लागलं.


नोटाबंदीमुळे जमा झालेले पैसे तुमच्यावर खर्च करण्यासाठी आमचं सरकार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. या देशात शक्ती आणि संकल्पाची कमी नाही. काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते, दिल्लीतून एक रुपया निघाल्यास जनतेपर्यंत 15 पैसेच पोहोचतात. हा कोणता पंजा आहे जो 85 पैसे मधल्या मध्ये गायब करतो. हा पंजा 1 रुपयाचे 15 पैसे कसे करतो. नोटाबंदीनंतर हा पैसा बाहेर आला आहे. बऱ्याचदा विरोधकांकडून स्वच्छ भारत सारख्या योजनांची खिल्ली उडवली जाते. पर्यटनाची मस्करी केली जाते.
आमचा हेतू मुलाचं शिक्षण, तरुणाच्या नोकऱ्या, शेतकऱ्यांचा मालाला भाव, वयोवृद्धांना मुबलक प्रमाणात औषधं पुरवण्याचा आहे. छत्तीसगडमध्ये वारंवार भाजपाला आशीर्वाद मिळत आला आहे. जनता जनार्दन आणि कार्यकर्त्यांच्या मजबूत संघटनामुळेच हे शक्य आहे.

 

Web Title: pm narendra modi attacks gandhi family on demonetization chhattisgarh assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.