ईदेला हिराबेन अब्बाससाठी बनवायच्या खास पदार्थ; मोदींसोबतच लहानाचा मोठा झाला मुस्लीम मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 04:07 PM2022-06-18T16:07:12+5:302022-06-18T16:08:21+5:30

PM Modi Mother Heeraben 100th birthday: पंतप्रधान मोदींनी ब्लॉग मध्ये सांगितली खास आठवण

pm narendra modi blog mother heeraben 100th birthday story about Muslim friend Abbas Gandhinagar Eid | ईदेला हिराबेन अब्बाससाठी बनवायच्या खास पदार्थ; मोदींसोबतच लहानाचा मोठा झाला मुस्लीम मुलगा

ईदेला हिराबेन अब्बाससाठी बनवायच्या खास पदार्थ; मोदींसोबतच लहानाचा मोठा झाला मुस्लीम मुलगा

googlenewsNext

PM Modi Mother Heeraben 100th birthday, Abbas: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन मोदी यांचा आज १००वा वाढदिवस आहे. हीराबेन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज गांधीनगरला पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आई हिराबेन मोदींचे पाय धुवून त्यांना नमस्कार केला. आईनेही मुलाचे तोंड गोड करून त्याला आशीर्वाद दिला. आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी पंतप्रधानांनी ब्लॉगच्या माध्यमातून काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यातच पंतप्रधान मोदी यांचा बालपणीचा मुस्लीम मित्र अब्बास याच्याबद्दलच्या आठवणीदेखील लिहिण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉगमध्ये अब्बासबद्दल लिहिलं आहे की, "आई नेहमी इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आनंदी असते. घर भले छोटं असेल पण तिचे मन खूप मोठे आहे. आमच्या घरापासून थोडे दूर एक गाव होते. तिथे माझ्या वडिलांचे खूप जवळचे मुस्लीम मित्र राहत असत. त्यांचा मुलगा अब्बास माझा मित्र होता. वडिलांच्या मित्राच्या अकाली निधनानंतर वडिलांनी असहाय्य अब्बासला आमच्या घरी आणले. एकप्रकारे अब्बास आमच्या घरी राहून लहानाचा मोठा झाला आणि अभ्यास करू लागला."

"आम्हां सर्व मुलांप्रमाणे आई अब्बासचीही खूप काळजी घ्यायची. ईदच्या दिवशी आई अब्बाससाठी खीर आणि त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. इतकंच नाही तर आजूबाजूची काही मुलं सण-उत्सवात आमच्या घरी जेवायला असायची. माझ्या आईच्या हाताने बनवलेले पदार्थ अब्बासला खूप आवडायचे", अशी आठवण पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितली.

पंतप्रधानांनी पुढे लिहिले, "जेव्हा आमच्या घराजवळ कोणतेही साधु, ऋषी यायचे, तेव्हा आई त्यांना घरी बोलावून भोजन खाऊ घालायची. ते घरातून पुढील प्रवासासाठी निघाले की आमची आई स्वतःसाठी नाही तर आम्हां भावा-बहिणींसाठी आशीर्वाद मागायची. माझ्या मुलांना एकमेकांच्या सुख-दु:खात एकमेकांची साथ देण्याची सवय लागू द्या असा आशीर्वाद देण्यास आई त्यांना सांगायची." तसेच, मुलांमध्ये भक्ती आणि सेवा रुजवण्यासाठी आईने आम्हाला योग्य शिकवण दिल्याचेही मोदींनी ब्लॉगच्या माध्यमातून लिहिले आहे.

Web Title: pm narendra modi blog mother heeraben 100th birthday story about Muslim friend Abbas Gandhinagar Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.