Modi New Cabinet: 4 माजी मुख्यमंत्री, 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर...; असं असेल PM मोदींचं नवं मंत्रिमंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:27 PM2021-07-07T14:27:05+5:302021-07-07T14:28:20+5:30
मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांसह 18 माजी राज्यमंत्री, 39 माजी आमदार आणि 23 असे खासदारही असतील, जे तीन अथवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे मंत्रिमंडळ कसे आसेल? यासंदर्भातील एक ठोकताळा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांना जागा मिळणार आहे. तसेच, या मंत्रिमंडळात 13 वकील, 6 डॉक्टर आणि 5 इंजिनिअर्सद्खील असतील. महत्वाचे म्हणजे यात तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात 14 मंत्री असे असतील, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षाही कमी असेल.
मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांसह 18 माजी राज्यमंत्री, 39 माजी आमदार आणि 23 असे खासदारही असतील, जे तीन अथवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत.
वकील आणि डॉक्टरी पेशाशी संबंधित मंत्री -
मोदींच्या मंत्रिमंडळात ज्यांना जागा मिळणार, त्यांत 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर, 7 माजी सिव्हिल सर्व्हंट आहेत. याच बरोबर, 46 जण असेही आहेत, ज्यांना केंद्र सरकारमध्ये कामाचा अनुभव आहे. मंत्रिमंडळाचे सरासरी वय आता 58 वर्ष एवढे आहे. यातील 14 मंत्री असे असतील ज्यांचे वय 50 पेक्षा कमी असेल. याशिवाय या मंत्रिमंडळात 11 महिलांनाही स्थान दिली जाईल. यांपैकी दोन कॅबिनेट मंत्री असतील.
नव्या मंत्रिमंडळात दिसणार मोदींचं सोशल इंजिनिअरिंग -
मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात 5 अल्पसंख्याक मंत्री असतील. यात, 1 मुस्लीम, 1 शिख, 2 बौद्ध, 1 ख्रिश्चन असेल. मंत्रिमंडळात 27 ओबीसी मंत्री असतील. यातील 5 जणांना कॅबिनेट मंत्री केले जाईल. याच बरोबर 8 अनुसूचित जमातीचे मंत्री असतील. यांपैकी तिघांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल. तसेच 12 अनुसूचित जातीतील असतील. यांपैकी दोघांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जाईल.