TIME Influential List: टाइम मॅग्झिनच्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत PM मोदींसह ममता अन् अदर पूनावालांचही नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:07 PM2021-09-15T22:07:06+5:302021-09-15T22:08:39+5:30
भारतीय-अमेरिकन पत्रकाराने टाइम्स 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पीएम मोदींबद्दल लिहिले आहे की, कोविड -19चे चांगले व्यवस्थापन केले असले तरी, मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. या सर्व गोष्टी असूनही, लोकांमध्ये त्याचे रेटिंग थोडे कमी असूनही सर्वोच्च आहे.
नवी दिल्ली - टाइम मॅग्झिनने 2021 च्या 100 प्रभावशाली लोकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांच्या नावाचाही समावेश आहे. टाइम मॅग्झिनने बुधवारी ही यादी प्रसिद्ध केली. (PM Narendra Modi CM Mamata Banerjee and Adar Poonawala are in time magazine most influenial people 2021 list)
या यादीत, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ससेक्सचे प्रिन्स हॅरी आणि मेगन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यासारख्या जागतिक नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तालिबानचा सहसंस्थापक दहशतवादी मुल्ला अब्दुल गनी बरदारचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
"महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?"
भारतीय-अमेरिकन पत्रकाराने टाइम्स 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पीएम मोदींबद्दल लिहिले आहे की, कोविड -19चे चांगले व्यवस्थापन केले असले तरी, मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. या सर्व गोष्टी असूनही, लोकांमध्ये त्याचे रेटिंग थोडे कमी असूनही सर्वोच्च आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळविला. भाजपने या निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांसह, आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली होती. मात्र, असे असतानाही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीने मोठा विजय मिळविला, असे यात म्हणण्यात आले आहे.
हातात बॅग घेऊन पंतप्रधान 'मोदी' ट्रेननं कुठे निघाले...? आपणही फसलात ना...?