पंतप्रधान मोदी 5 वर्षे कसं चालवणार सरकार? 'योग वाली सरकार' म्हणत बाबा रामदेव स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 04:17 PM2024-06-20T16:17:59+5:302024-06-20T16:19:55+5:30
संपूर्ण देशभरात शुक्रवारी (२१ जून २०२४) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी तयारीही सुरू आहे.
हे 'योगाचे सरकार' आहे. यावेळी सरकारला संतुलितपणेच चालावे लागेल. पंतप्रधान मोदींना सर्वांना सोबत घेऊन चालता येते आणि ते संपूर्ण पाच वर्ष सरकार चालवतील, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशभरात शुक्रवारी (२१ जून २०२४) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी तयारीही सुरू आहे.
योग दिवसाच्या एक दिवस आधी योग गुरु बाबा रामदेव यांनी एबीपी न्यूजसोबत योग बरोबरच राजकारणासंदर्भातही संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीत जय-परायज होतच असतो. कुणाचा जय होईल तर कुणाचा पराजय. मात्र आपण विरोधकांच्या भूमिकांचाही सन्मान करायला हवा. असे झाल्यास वैचारिक लोकशाही होईल.
"संपूर्ण ५ वर्षं सरकार चालवतील पंतप्रधान मोदी" -
२०१४ आणि २०१९ मध्ये एकट्या भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. मात्र यावेळी संपूर्ण एनडीए मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. यावेळी स्पष्ट बहुमत नसल्याने संतुलितपणे चालावे लागेल, असे बोलले जात आहे, असे विचारले असता बाबा रामदेव म्हणाले, हे योगाचे सरकार आहे. यावेळी सरकारला संतुलन ठेऊनच चालावे लागेल. पंतप्रधान मोदींना सर्वांना सोबत घेऊन चालता येते. ते संपूर्म पाच वर्ष सरकार चालवतील.
नितीश कुमारांचंही कौतुक -
यावेळी, बाबा रामदेव यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, माध्यमांनी त्यांची छबी पलटूराम अशी केली आहे. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि आता भाजपसोबत आहेत आणि भाजप सोबतच राहतील. ते कुठेही जाणार नाहीत.