“येत्या ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू”; पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 01:41 PM2024-04-15T13:41:31+5:302024-04-15T13:42:00+5:30

PM Modi Rally In Palakkad Kerala: काँग्रेसचे युवराज तुमच्याकडून मते मागतील पण केरळ प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

pm narendra modi criticised congress and rahul gandhi in palakkad kerala rally for lok sabha election 2024 | “येत्या ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू”; पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी!

“येत्या ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू”; पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी!

PM Modi Rally In Palakkad Kerala: लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्याचे निर्णय घेण्याची निवडणूक आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्याची आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल आयुष्याची हमी देणारी निवडणूक आहे. पलक्कडला केरळचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. येथील नैसर्गिक सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. केरळमध्ये येथे अनेक मंदिरे, चर्च आणि श्रद्धास्थळे आहेत. येत्या ५ वर्षात आम्ही केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू. तुमचा पाठिंबा आणि प्रेम पाहून विश्वासाने सांगू शकतो की, केरळने नवीन वर्षाने एक नवीन सुरुवात केली आहे. हे नवीन वर्ष केरळच्या विकासाचे वर्ष असेल आणि हे नवीन वर्ष नव्या राजकारणाच्या सुरुवातीचे वर्ष असेल. केरळवासी आपला एक बुलंद आवाज संसदेत पाठवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर दौरे करत आहेत. केरळमधील पल्लकड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी बोलताना भाजपाच्या संकल्पपत्रातील आश्वासनांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. एलडीएफ आणि यूडीएफपासून सावध राहा. केरळ काँग्रेस डाव्या लोकांना 'दहशतवादी' म्हणून संबोधते. पण दिल्लीत ते एकत्र बसतात, एकत्र जेवतात आणि निवडणुकीची रणनीती बनवतात. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला उत्तर प्रदेशातील आपला पारंपारिक, कौटुंबिक मतदारसंघ सोडून लाज वाचवण्यासाठी केरळमध्ये यावे लागले. इथे त्यांनी आपला नवा तळ बनवला. काँग्रेसचे युवराज केरळच्या जनतेकडून मते मागतील पण तुमच्या प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

भाजपाचे संकल्पपत्र हे देशाच्या विकासाचे संकल्पपत्र आहे

भाजपाने आपला जाहीरनामा संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. भाजपाचे संकल्पपत्र हे देशाच्या विकासाचे संकल्पपत्र आहे. भाजपाच्या संकल्प पत्राला मोदी गॅरंटी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केरळमधील ७३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. आता भाजपाने जाहीर केले आहे की, ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातील आणि ही मोदींची गॅरंटी आहे. भाजपने पुढील पाच वर्षांसाठी 'विकास', 'विरासत' याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. केरळला हायवे एक्स्प्रेसवे आणि हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन्सच्या नेटवर्कने जोडले जात आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

दरम्यान, एनडीए सरकारने जगभरात भारताची विश्वासार्हता कशी वाढवली, हे केरळच्या जनतेने गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे. काँग्रेस सरकारने भारताची प्रतिमा कमकुवत देश अशी निर्माण केली होती. भाजपा सरकारने भारताला मजबूत देश बनवले आहे. युद्धात अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्याची ताकद आजच्या भारतामध्ये आहे. केरळमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ३६ लाखांहून अधिक नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. ज्या गतीने जल जीवन, जल मिशन संपूर्ण देशात राबवले गेले आहे, केरळ सरकार तसे होऊ देत नाही, त्यामुळेच आजही केरळमध्ये घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. केरळमधील प्रत्येक घरांत पाणी पोहोचवण्याची गॅरंटी देतो, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले.
 

Web Title: pm narendra modi criticised congress and rahul gandhi in palakkad kerala rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.