Delhi Election 2020 : शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 05:16 PM2020-02-03T17:16:09+5:302020-02-03T20:50:55+5:30

केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे.

pm narendra modi delhi assembly elections 2020 rally karkardooma bjp | Delhi Election 2020 : शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट- मोदी

Delhi Election 2020 : शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट- मोदी

googlenewsNext

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या केजरीवालांवर लोकपाल, बाटला हाऊस एन्काऊंटर आणि CAA विरोधात शाहीन बाग सुरू असलेल्या हिंसाचारावरून टीकास्त्र सोडलं आहे. देशाच्या सौहार्दाला खंडित करण्यासाठी ही सर्व कटकारस्थानं सुरू आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. दिल्लीत मोदी सरकार येण्याआधी दहशतवादी हल्ले होत होते, परंतु ते आता थांबले आहेत. गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांनी ठार केल्यावर ते बनावट एन्काऊंटर असल्याचा कांगावा करण्यात आला. शाहीन बागच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेस आणि आपवर हल्लाबोल केला आहे. शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तसेच दिल्लीच्या लोकांना विकासासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे होतं. केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे. दिल्लीतल्या लोकांनी परिवर्तनाचं मन बनवलं असून, सर्वच स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कडकडडुमामध्ये पोहोचले असून, त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं आहे. 

दिल्ली फक्त शहरच नसून त्याला वारसा लाभलेला आहे. दिल्लीनं नेहमीच सर्वांचा सत्कार केलेला असून, सगळ्यांनाच स्वीकारलेलं आहे. फाळणीनंतर आलेल्या किंवा इतर राज्यांतील भारतीयांना दिल्लीनं आपल्या हृदयात सामावून घेतलं आहे. दिल्लीतल्या सातही जागा आम्हाला देऊन दिल्लीचे लोक कोणत्या दिशेनं विचार करतात हे समजलं आहे.


देश बदलवण्यात दिल्लीच्या लोकांचं मोठं योगदान आहे. आता मतदार मतांनी दिल्लीसुद्धा बदल घडवणार आहेत. आम्ही संसदेत दिल्लीला अवैधरीत्या कॉलनीच्या समस्यांपासून मोकळं केलं आहे. आता दिल्लीच्या लोकांना सरकारी बुलडोझरला घाबरण्याची गरज नाही. जिथे झोपड्या आहेत, तिथे पक्की घरं देण्यात येणार  आहेत. पक्क्या घरात गॅस कनेक्शन, नळ, पाणी यांसारख्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

भाजप नकारात्मकतेचं नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी आम्ही केलेले संकल्प मोठे आहेत. देशासमोरली शेकडो आव्हाने आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. पण तो प्रश्न आम्ही सोडवून दाखवला. 





 

Web Title: pm narendra modi delhi assembly elections 2020 rally karkardooma bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.