Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 12:04 PM2020-03-03T12:04:29+5:302020-03-03T12:12:26+5:30
Narendra Modi: दिल्ली हिंसाचारानंतर पहिल्यांदा २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं होतं.
नवी दिल्ली - सीएएच्या मुद्द्यावरुन देशाच्या राजधानी दिल्लीत गेल्या आठवडाभरापासून हिंसाचार पेटला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ४० हून अधिक लोकांचा जीव गेला. अनेकांची घरे जाळण्यात आली, दुकाने लुटली, दंगल पेटवण्यात आली. या संपूर्ण प्रकारावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारला घेरण्यात येत आहे.
सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. हिंसाचार भडकवण्यामागे सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरली, अनेक अफवांमुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येतात. सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी ट्विट केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. अशातच आज भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसाचाराच्या घटनेवरुन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
दिल्ली: पार्लियामेंट लाइब्रेरी बिल्डिंग में भाजपा की संसदीय दल की बैठक के लिए पहुंचे नेतागण। pic.twitter.com/wx3jm9YA9x
— ANI_HindiNews (@AHindinews) March 3, 2020
या बैठकीला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात शांतता आणि एकता गरजेची आहे. सबका साथ-सबका विकास करत असताना सबका विश्वासही महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी सर्वात पहिलं माझा देश महत्त्वाचा आहे त्यानंतर पक्ष आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देश सर्वोच्च आहे. विकास भाजपाचा मंत्र आहे. त्यासाठी शांतता आणि सद्भावना गरजेचे आहे. विकास पुढे घेऊन जायचा आहे. फक्त बोलू नका तर प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावना राखण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिली.
Parliamentary Affairs Minister, Pralhad Joshi: Prime Minister Modi said that for development, there must be peace, unity and harmony. He also said that even today there are some parties that keep party interest above national interest. https://t.co/cqxsG1Z1d1pic.twitter.com/lgPvAecRBa
— ANI (@ANI) March 3, 2020
दिल्ली हिंसाचारानंतर पहिल्यांदा २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं होतं. तब्बल ६९ तासांनंतर आलेल्या या ट्विटमुळे पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी टीकाही केली. लोकांना शांतता राखण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं. या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, दिल्लीच्या विविध भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वांनी शांतता व बंधुता टिकवून ठेवण्याचं काम करावं अशी विनंती त्यांनी केली होती.
दरम्यान, सोमवारी अचानक मोदींनी टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं म्हटलं, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.