भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत PM नरेंद्र मोदींनी दिली खूशखबर, म्हणाले, आता... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 08:44 PM2023-08-18T20:44:16+5:302023-08-18T20:47:23+5:30

Indian Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत सकारात्मक चित्र दाखवणाऱ्या काही अहवालांचा उल्लेख करत देशवासीयांना खूशखबर दिली आहे.

PM Narendra Modi gave good news about India's economy, said, now... | भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत PM नरेंद्र मोदींनी दिली खूशखबर, म्हणाले, आता... 

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत PM नरेंद्र मोदींनी दिली खूशखबर, म्हणाले, आता... 

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत सकारात्मक चित्र दाखवणाऱ्या काही अहवालांचा उल्लेख करत देशवासीयांना खूशखबर दिली आहे. भारत न्यायोचित आणि सामूहिक समृद्धीच्या दिशेमध्ये चांगली प्रगती करत आहे. तसेच तो आर्थिक समृद्धीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया साईट लिंक्डइनवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी हल्लीच प्रकाशित झालेले दोन लेख पाहिले आहेत. हे लेख भारतीय अर्थव्यवस्थेबाबत उत्साहजनक भूमिका असणाऱ्या सर्वांना आवडतील. यामधील एक रिपोर्ट ही एसबीआयच्या रिसर्चची आहे. तर दुसरी रिपोर्ट पत्रकार अनिल पद्मनाभन यांनी लिहिलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, या रिपोर्टमधून काही अशा पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यांना पाहून आपण आनंदित झालं पाहिजे. या लेखांमधील माहितीनुसार भारत न्यायोचित आणि सामूहिक समृद्धी साध्य करण्याच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती करत आहे.  

यावेळी मोदींनी अहवालामध्ये दिलेल्या काही आकड्यांचा उल्लेख करताना सांगितले की, एसबीआय रिसर्चने गोळा केलेल्या आयकर रिटर्नच्या आधारावर वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये सरासरी उत्पन्न १३ लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २०१३-१४ मध्ये ४.४ रुपये होती.

मोदींनी सांगितले की, राष्ट्रीय प्रगतीसाठी समृद्धी वाढवणं चांगली गोष्ट आहे. निसंशयपणे आम्ही आर्थिक समृद्धीसाठी एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने अग्रेसर आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प अनेकदा बोलून दाखवला आहे. भारत हा सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी हत्या आहे.  

Web Title: PM Narendra Modi gave good news about India's economy, said, now...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.