पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 08:38 AM2018-05-01T08:38:03+5:302018-05-01T08:38:03+5:30
भविष्यात महाराष्ट्राने यशाची नवी शिखरे पादाक्रांत करावीत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी राज्यातील जनतेला ट्विटरवरून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्याच दिवशी स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. या दिवसाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा. महाराष्ट्राची सातत्याने प्रगती व भरभराट होवो, अशी आशा मी बाळगतो. तसेच भविष्यात महाराष्ट्राने यशाची नवी शिखरे पादाक्रांत करावीत व राज्याचे देशाच्या वाटचालीमध्ये राज्याचे योगदान असेच वाढत जावे, असा संदेश मोदींनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.
तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेलाही गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येथील लोक त्यांच्या साधेपणासाठी व व्यापारी कौशल्यासाठी ओळखले जातात. देशाच्या वाटचालीत गुजरातचे नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. विशेषत: स्वातंत्र्य चळवळीत गुजरातने मोलाची कामगिरी बजावली. भविष्यातही गुजरातने अशीच कामगिरी करावी, असे मोदींनी म्हटले आहे.
Best wishes to the people of Maharashtra on their Statehood Day. I pray for the continued progress and prosperity of Maharashtra. May the state scale new heights and keep contributing to the development journey of our nation.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2018
Greetings on Gujarat Diwas. The state’s people are known for their simplicity and entrepreneurial zeal. Gujarat has made a significant contribution in our nation’s history, especially during the freedom movement. May Gujarat continue to add impetus to India’s progress.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2018
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2018