काँग्रेसनं दंगल घडवणाऱ्यांना मुख्यमंत्री बनवलं, मोदींची नाव न घेता कमलनाथांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:15 PM2019-01-03T17:15:19+5:302019-01-03T17:18:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
गुरुदासपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं दंगलीचा आरोप असलेल्या लोकांना मुख्यमंत्री बनवलं आहे. काँग्रेसमध्ये आतापर्यंत फक्त एका कुटुंबाचंच गुणगान झालं. आता ते वंदे मातरम् आणि भारत मातेला विरोध करत आहे. पंजाबमधल्या गुरदापूरमध्ये त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोदींनी 1984च्या शीख दंगलीचा उल्लेख करत सांगितलं की, एका कुटुंबाच्या इशाऱ्यानं ज्या ज्या आरोपींना सज्जन सांगून फायली बंद करण्यात आल्या, एनडीए सरकारनं सत्तेवर आल्यानंतर त्या सर्व फायली बाहेर काढल्या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली असून, त्याचा परिणामही समोर आला आहे.
PM Narendra Modi in Gurdaspur,Punjab: Jaise Congress ne desh ko 'gharibi hatao' ke naare ke saath thaga, vo ab desh ko karzmaafi ke naam par thag rahi hai pic.twitter.com/tQ7KmpXpzB
— ANI (@ANI) January 3, 2019
PM Narendra Modi in Gurdaspur,Punjab: Ek parivaar ke ishaare par jin jin aaropiyon ko 'sajjan' bata kar file daba di gayi, NDA sarkar ne unko bahar nikala, SIT ka gathan kiya aur parinaam sabke saamne hai pic.twitter.com/MGNI3TfMKK
— ANI (@ANI) January 3, 2019
देशाचं विभाजन होत असताना काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळेच करतारपूर साहिब पाकिस्तानात गेलं.
PM Narendra Modi in Gurdaspur,Punjab on #kartarpurcorridor: Just for their politics, Congress leaders gave a chance to Pakistan, surprising that these Congress leaders did not even pay heed to their own Punjab CM. pic.twitter.com/hKUMpPlacW
— ANI (@ANI) January 3, 2019
काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळेच 70 वर्षांपासून भाविकांना दुर्बिणीनं करतारपूर साहिबचं दर्शन घ्यावं लागत आहे. गुरुदासपूरची जमीन ही देश, समाज, मानवतेसाठी एक प्रेरणादायी राहिली आहे.
PM Modi in Gurdaspur,Punjab: Jinka itihaas hazaron Sikh bhai behno ko berahmi se hatya ka ho aur jo aaj bhi dango ke aaropiyon ko mukhyamantri pad ka puruskar de rahe hain, un logon se Punjab samet desh vasiyon ko satark rehne ki zarurat hai. pic.twitter.com/qwq378fAe6
— ANI (@ANI) January 3, 2019
2022मध्ये न्यू इंडियाच्या माध्यमातून सव्वा कोटी देशवासीयांचं संकल्प पूर्ण करण्यासाठी इथूनच प्रेरणा मिळाली आहे. काँग्रेसचा इतिहास शीख भाऊ-बहिणींचा हत्या करणारा असून, त्यांनी देशात दंगली घडवणाऱ्या आरोपींना मुख्यमंत्रिपदी बसवलं. त्यांच्यापासून पंजाबसह देशवासीयांनी सुरक्षित राहण्याची गरज आहे.