पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दिलाय एक अनोखा टास्क, 1 महिन्यात पूर्ण करण्याचं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:49 AM2023-03-28T11:49:16+5:302023-03-28T11:49:53+5:30

या कार्यक्रमांतर्गत खासदारांना एक महिन्याचा कार्यक्रम तयार करून PMO सोबत शेअर करावा लागणार आहे.

PM Narendra Modi has given a unique task to the party MPs, a target to complete in 1 month | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दिलाय एक अनोखा टास्क, 1 महिन्यात पूर्ण करण्याचं लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दिलाय एक अनोखा टास्क, 1 महिन्यात पूर्ण करण्याचं लक्ष्य

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पक्षाच्या खासदारांना एक अनोखा टास्क दिला आहे. पंतप्रधानांनी आपल्या खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे ते 15 जून या कालावधीत सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात राहायचे आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्व खासदारांना सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम तयार करून आपापल्या मतदारसंघात प्रचार आणि प्रसार करण्याचे निर्देश दिले आहेत.

या कार्यक्रमांतर्गत खासदारांना एक महिन्याचा कार्यक्रम तयार करून PMO सोबत शेअर करावा लागणार आहे. याशिवाय भाजप 6 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय पंधरवाडा साजरा करणार आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या स्थापना दिवसापासून ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचार करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सांगितले आहे.

मोदी म्हणाले, 15 मे ते 15 जून या काळात सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त सर्व खासदार सरकारने केलेली सर्व महत्त्वाची कामे जनतेसमोर नेतील. राजकीय नसलेल्या कार्यांचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो. बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये लिंग गुणोत्तरात सुधारणा झाली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पृथेवी आणि पर्यावरणात सुधारणा करण्यासाठी पुढील काळात सर्व खासदारांनी मोहीम चालवावी. नव-नव तंत्रज्ञान बाजारात येत आहे. त्यासाठी एक्सपर्ट टीमची मदत घ्यावी.' याच बरोबर त्यांनी आपल्या खासदारांना संस्कृतीक महोत्सव चालविण्याचेही आवाहन केले आहे.
 

Web Title: PM Narendra Modi has given a unique task to the party MPs, a target to complete in 1 month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.