Narendra Modi : "अत्याचार, विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे TMC, गरिबांची लूट केली"; मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 02:19 PM2024-03-02T14:19:20+5:302024-03-02T14:34:20+5:30
Narendra Modi And Mamata Banerjee : एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, टीएमसी हे अत्याचाराचं दुसरं नाव आहे. TMC म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगाल दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कृष्णनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, "टीएमसी हे अत्याचाराचं दुसरं नाव आहे. TMC म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे. ममता बॅनर्जींच्या टीएमसीला लोकांना गरीब ठेवायचे आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा विकास होणं आवश्यक आहे. मोदींनी पश्चिम बंगालला पहिलं एम्स दिलं आहे."
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हणाले की, "ही भूमी भगवान कृष्णाच्या भक्तीचे सर्वोच्च प्रचारक चैतन्य महाप्रभू यांची जन्मभूमी आहे. चैतन्य महाप्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो. हे माझे सौभाग्य आहे की काही दिवसांपूर्वीच मला समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन भूमीला, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या द्वारका नगरीला नमन करण्याचं भाग्य लाभले."
#WATCH | At Krishnanagar, West Bengal, Prime Minister Narendra Modi says "The way TMC is working here, they have disappointed the people of West Bengal. People have continuously voted for TMC but this party has become another name for atrocities and betrayal. For TMC, the… pic.twitter.com/19rnyHystu
— ANI (@ANI) March 2, 2024
"एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे जमलेले पाहून 'एनडीए सरकार, 400 पार' हे सांगण्याचा आत्मविश्वास मला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये हा माझा दुसरा दिवस आहे. गेल्या 2 दिवसात मला बंगालसाठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. यामुळे गुंतवणूक येईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शेजारच्या भागावर परिणाम होईल. मात्र, तृणमूल सरकारने बंगालच्या जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, हे मान्य करावे लागेल. लोकांची ते सतत फसवणूक करत आहेत."
"बंगालमध्ये ज्या प्रकारे टीएमसी सरकार चालवत आहे, त्यामुळे बंगालची निराशा झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने टीएमसीला एवढा मोठा जनादेश वारंवार दिला आहे, पण टीएमसी हे अत्याचार आणि विश्वासघाताचे दुसरं नाव झालं आहे. तृणमूल काँग्रेससाठी बंगालचा विकास नसून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्राधान्य आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी एका सरकारी कार्यक्रमादरम्यान पश्चिम बंगालमध्ये 15,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.