“सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 07:51 AM2024-08-15T07:51:45+5:302024-08-15T07:54:16+5:30

PM Modi addresses the nation on 78th Independence Day: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले.

pm narendra modi hoist tiranga at red fort on 78th independence day and addressed to nation | “सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो”: PM मोदी

“सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो”: PM मोदी

PM Modi addresses the Nation on 78th Independence Day: संपूर्ण देश ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विकसित भारत करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनाच्या सांगितले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या अगणित स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या चिंतेत भर पडली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपले कुटुंबीय गमावले; राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. त्या सर्वांप्रती सहानुभूती व्यक्त करतो आणि खात्री देतो की, या संकटाच्या वेळी हे राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

२०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो

आताच्या घडीला देशात १४० कोटी जनता आहे. जर आपण संकल्प केला आणि एकत्रितपणे वाटचाल केली तर, सर्व अडथळे पार करत २०४७ पर्यंत नक्कीच विकसित भारत बनवू शकतो, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी संबोधनाच्या सुरुवातीला केला. एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान द्यायला तयार होते. परंतु, आजचा काळ देशासाठी जगण्याचा आहे. देशासाठी बलिदान देण्याची तयारी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर देशासाठी जगण्याचा संकल्प भारताला समृद्ध करू शकतो. नेशन फर्स्टच्या संकल्पाने आम्ही प्रेरित आहोत. 'व्होकल फॉर लोकल'चा मंत्र आम्ही दिला. मला आनंद होत आहे की, व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

दरम्यान, आमच्या सुधारणांची बांधिलकी चार दिवसांच्या टाळ्यांसाठी नाही, आमच्या सुधारणांची प्रक्रिया कोणत्याही जबरदस्तीमुळे घडून आलेली नाही, तर ती देशाला मजबूत करण्याची आहे. आम्ही राजकीय दबावामुळे कोणताही निर्णय घेत नाही, आम्ही राजकीय गणितांनुसार निर्णय घेत नाही. आमचा एकच संकल्प आहे की, प्रथम राष्ट्रहित, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
 

Web Title: pm narendra modi hoist tiranga at red fort on 78th independence day and addressed to nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.