दिल जीत लिया मोदी जी! स्वतःच छत्री घेऊन संसदेत पोहोचले PM मोदी; PHOTO व्हायरल, होतेय जबरदस्त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:35 PM2021-07-19T17:35:35+5:302021-07-19T17:38:52+5:30
जोरदार पाऊस सुरू असतानाही मोदी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतःची छत्री स्वतःच पकडलेली होती. काही मंत्रीही यावेळी मोदींसोबत उभे होते. मोदींचे यावेळचे फोटो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि यावर लोकांमध्ये जबरदस्त चर्चाही सुरू आहे.
नवी दिल्ली -संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात मोदी सरकार कोण कोणती विधेयकं मंजूर करून घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसच, यावेळी विरोधकही करोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ आणि कृषी विधेयकांच्या मुद्यांवर आक्रमक असतील. तत्पूर्वी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, यावेळी जोरदार पाऊस सुरू असतानाही ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतःची छत्री स्वतःच पकडलेली होती. काही मंत्रीही यावेळी मोदींसोबत उभे होते. मोदींचे यावेळचे फोटो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि यावर लोकांमध्ये जबरदस्त चर्चाही सुरू आहे. (PM Narendra Modi holds umbrella pictures ahead of monsoon session going viral on social media)
या फोटो संदर्भात, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत लिहिले आहे, साधे जीवन आणि उच्च विचार प्रकट करताना देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी. हा फोटो आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीचा आहे. जेव्हा ते पत्रकारांसोबत बोलत होते.
'सादा जीवन उच्च विचार' के सिद्धांत को चरितार्थ करते देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी।
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) July 19, 2021
ये तस्वीर आज से शुरू हो रहे मानसून सत्र के पहले की है जब वे पत्रकारों से चर्चा कर रहे थे। pic.twitter.com/VMECqlgVDt
एका युझरने यासंदर्भात कमेंट करताना म्हटले आहे, पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी माध्यमांशी संवाद साधताना. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या पंतप्रधानांचे पावसात स्वतःच छत्र पकडून उभे राहणे त्यांचे सरळ व्यक्तिमत्व दर्शवते.
मानसून सत्र से पहले पीएम मोदी मीडिया से बात करते हुए। विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के प्रधानमंत्री का बारिश के दौरान स्वयं छाता पकड़कर खड़े होना सरल व्यक्तित्व को प्रदर्शित करता है। #NarendraModipic.twitter.com/ihykpLtO6J
— Digvijay Singh 🇮🇳 (@Digvijaybjp27) July 19, 2021
पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले मोदी -
कोरोनाच्या महासाथीचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. संसदेत या महासाथीच्या संबंधात चर्चा केली जावी. खासदारांकडून सर्व सूचनाही मिळाव्यात, जेणेकरून या महासाथीचा सामना करण्यासाठी आपल्या लढाईला अधिक बळकट करता येईल आणि कमतरताही दूर केल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
परखड प्रश्न विचारा, पण सरकारलाही उत्तर देण्याची संधी द्या -
या सभागृहात चर्चा केली गेली पाहिजे. देशाच्या जनतेला उत्तरं हवी आहेत. ती उत्तरं देण्याची सरकारची तयारी आहे. मी सर्व खासदार आणि राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी परखड प्रश्न विचारावेत, परंतु सरकारलाही शांत वातावरणात उत्तर देण्याची संधीही द्यावी, असही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
एका युझरने पंतप्रधान मोदींचा यावेळचा फोटो शेअर करत 'मन जिंकले मोदी जी' असे लिहिले आहे.
दिल जीत लिया मोदी जी ❤️ pic.twitter.com/2SWtNEKHzs
— Varun Rastogi 🇮🇳 (@Thevarunrastogi) July 19, 2021