...तर आपण विश्वासाच्या कमतरतेवरही मात करू शकतो! 'सबका साथ' म्हणत, PM मोदींचा जगाला 'महामंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 01:58 PM2023-09-09T13:58:39+5:302023-09-09T13:59:24+5:30

Pm Narendra Modi First Speech In G20 Summit : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे स्वागत करत त्यांना संबोधित केले आणि अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले.

PM Narendra Modi in G20 Summit give big mantra to the world and says we can overcome the lack of faith in the world too | ...तर आपण विश्वासाच्या कमतरतेवरही मात करू शकतो! 'सबका साथ' म्हणत, PM मोदींचा जगाला 'महामंत्र'

...तर आपण विश्वासाच्या कमतरतेवरही मात करू शकतो! 'सबका साथ' म्हणत, PM मोदींचा जगाला 'महामंत्र'

googlenewsNext

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेची सुरुवात केली. भारत मंडपम प्रगती मैदान येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे स्वागत करत त्यांना संबोधित केले आणि अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. त्यांनी G20 मध्ये भारताचे व्हिजनही सर्वांसमोर ठेवले. तसेच, आता संपूर्णजगाने हातात हात घेऊन आणि विश्वासाने वाटचाल करण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

आफ्रिकन युनियनच्या सदस्यत्वाची घोषणा -
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन युनियनच्या सदस्यत्वाचीही घोषणा केली. तसेच, या सदस्यत्वावर सर्वांची सहमती असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे, आफ्रिकन युनियनमध्ये एकूण 55 देशांचा समावेश आहे. आफ्रिकन युनियनच्या समावेशानंतर, G20 आता G21 देखील होऊ शकते. 

महत्वाचे म्हणजे, दक्षिण आफ्रिकेच्या समावेशामुळे, G20 हा युरोपियन युनियननंतर, आता देशांचा दुसरा सर्वात मोठा समू बनला आहे. यानंतर, कोमोरोस युनियनचे अध्यक्ष तथा आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असौमनी (Azali Assoumani) यांनी आपले स्थान स्वीकारले आणि G20 चे स्थायी सदस्य बनले.

पंतप्रधान मोदींचा जगाला मंत्र -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "या काळात, 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. आज, G20 च्या अध्यक्षाच्या रुपात भारत संपूर्ण जगाला, जागतिक विश्वासाचे रुपांतर विश्वासात करण्याचे आवाहन करतो आहे. ही आपल्या सर्वांसाठीच सोबतीने वाटचाल करण्याची वेळ आहे."

मोदी म्हणाले, "कोरोना महामारीनंतर, जगाला विश्वासातील कमतरतेच्या नव्या आव्हानाचा सामना करावा लागला आणि युद्धांमुळे तो आणखीनच वाढला. पण, जर आपण कोरोना सारख्या महामारीचा पराभव करू शकतो, तर आपण विश्वासाच्या कमतरतेवरही मात करू शकतो, हे आपण  लक्षात ठेवायला हवे.

Web Title: PM Narendra Modi in G20 Summit give big mantra to the world and says we can overcome the lack of faith in the world too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.