हातात मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो, डोळ्यांत अश्रूधारा...; पंतप्रधानांनी या तरुणाकडं पाहिलं अन्...! बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 23:33 IST2025-03-07T23:32:24+5:302025-03-07T23:33:29+5:30
...हे संपूर्ण दृष्य पंतप्रधान मोदींनी बघितले आणि आपली गाडी थांबवली.

हातात मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो, डोळ्यांत अश्रूधारा...; पंतप्रधानांनी या तरुणाकडं पाहिलं अन्...! बघा VIDEO
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सुरत येथे त्यांचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी ते ओपन कारने जात होते. याच वेळी एक अनोखे दृष्य दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी संबंधित मार्गावर मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या स्वागतासाठी रेलिंगच्या दुसऱ्या बाजूला उत्साहित लोक उभे होते. याच गर्दीत, उभा असलेला एक तरुण पंतप्रधानांना पाहून अत्यंत भावुक झाला.
या तरुणांच्या हातात एक सुंदर फोटो होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री हीराबेन यांचे स्केच होते. पंतप्रधान मोदींची कार या तरुणाच्या जवळ जवळ येताच, हा तरुण अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. हे संपूर्ण दृष्य पंतप्रधान मोदींनी बघितले आणि आपली गाडी थांबवली.
संबंधित तरुणाने हे स्केच पंतप्रधान मोदींना दिले, पंतप्रधान मोदींनीही ते स्वीकारले अन्...
यानंतर, त्या तरुणाने हे स्केच पंतप्रधान मोदींना दिले. पंतप्रधान मोदींनीही ते स्वीकारले आणि त्यावर ऑटोग्राफ देत, ते पुन्हा त्या तुरुणाला परत दिले. हा भावुक क्षण येथे उपस्थित असलेल्या अनेकांनी बघितला आणि अनेकांनी आपल्या मोबाईलमध्येही कैदही केला. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदींप्रति असलेल्या या आदराने आणि प्रेमाने सर्वांचेच लक्ष वेदून घेतले. पंतप्रधानांनीही या तरुणाच्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार केला.
सूरत में पीएम मोदी और उनकी स्वर्गीय माताजी की फोटो लिए भावुक हुए युवक को पीएम ने कुछ ऐसे संभाला pic.twitter.com/l3ZlfsWNV0
— Akhilesh Sharma (@akhileshsharma1) March 7, 2025
हा एक मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.