...म्हणून मी एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला, मोदींनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:04 PM2019-03-31T18:04:20+5:302019-03-31T18:10:16+5:30

कोणताही निर्णय घेताना राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार केला असता तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊन काहीच बदलंल नसतं, माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे

PM Narendra Modi interaction with people across India | ...म्हणून मी एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला, मोदींनी केला खुलासा 

...म्हणून मी एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला, मोदींनी केला खुलासा 

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर देशातील जनतेचा उद्रेक झाला होता. त्यानंतर भारतीय हवाई दलाने बालकोट परिसरात एअर स्ट्राईक केलं याचं संपूर्ण श्रेय भारतीय जवानांचे आहे. जवानांच्या शौर्याला सलाम आहे. याआधी देशात अनेक पंतप्रधान झाले असतील. जर कोणताही निर्णय घेताना राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार केला असता तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊन काहीच बदलंल नसतं, माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे म्हणून मी ठरवलं ज्याठिकाणाहून दहशतवाद्यांचे रिमोट कंट्रोल चालतं तिथेच हल्ला करायचा अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती दिली.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,  भारतीय जवानांवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशातील जवान आपल्या देशाची मान कधीच खाली पडू देणार नाहीत. जवानांच्या सामर्थ्यावर विश्वास असल्यानेच मी पूर्णपणे जवानांना स्वातंत्र दिले. सगळ्यांनाच माहित आहे दहशतवाद्यांचा मूळ कुठे आहे? दहशतवादी मुंबईत आले अनेकांना मारलं, उरीमध्ये आले जवानांवर हल्ला केला. हे कधीपर्यंत चालणार म्हणून मी निश्चित केलं, दहशतवाद्यांचं रिमोट कंट्रोल कुठून चालतं तिथेच हल्ला करायचा. माझ्यासाठी निवडणूक महत्त्वाची नव्हती तर देशाच्या सुरक्षेला मी प्राधान्य दिलं. पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालवली जातात. मात्र जगापासून लपविण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलतं म्हणून आम्ही अशा ठिकाणी वार केला त्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली असं पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र आपल्याच देशातील काही लोक मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानतात हे दुर्देव आहे अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.  

माझ्यासारख्या राजकीय व्यक्तीला कोणताही अनुभव नसताना देशाने माझ्या हातात पूर्ण बहुमत दिलं. जगात आज जी भारताची ताकद दिसते ती एकट्या मोदींमुळे दिसतेय असं नाही, तर त्या सव्वाशे करोड जनतेने पूर्ण बहुमताने दिलेलं सरकार आहे त्यामुळे जगात भारताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.



 

मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने मला दायित्व देऊन पंतप्रधानपदावर बसवलं. मी तेव्हा जनतेला आश्वासन दिलं होतं की जनतेचा पैसा मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही. मी चौकीदाराच्या रुपात आपली जबाबदारी पार पडेन आज मला आनंद होतोय की आज देशातील प्रत्येक नागरिक जो या देशासाठी काम करतोय तो चौकीदार आहे, देशाच्या जनतेला राजा-महाराजांची गरज नाही, चौकीदार हवाय अस मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.  चौकीदार ही एक भावना आहे. चौकीदार एक व्यवस्था आहे, चौकीदाराला ना कोणता गणवेश आहे ना कोणतंही बंधन आहे. देशाला हुकूमशहा नको आहे. देशाची जनता चौकीदाराला पसंत करते असं पंतप्रधानांनी सांगितलं. 



 

Web Title: PM Narendra Modi interaction with people across India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.