पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित वर्गासाठी देवा समान, केंद्रीय मंत्र्याकडून मोदींचं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:10 PM2022-09-02T18:10:00+5:302022-09-02T18:10:34+5:30

शेखावत म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या 8 वर्षांच्या शासन काळात ज्या लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे, त्यांना मोदी देवासमाव वाटतात.

pm narendra modi is like a god for dalit and tribal class says union minister gajendra singh shekhawat | पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित वर्गासाठी देवा समान, केंद्रीय मंत्र्याकडून मोदींचं भरभरून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित वर्गासाठी देवा समान, केंद्रीय मंत्र्याकडून मोदींचं भरभरून कौतुक

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब आणि दलित वर्गासाठी देवता समान आहेत, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावात यांनी म्हटले आहे. शेखावत यांनी चित्तौडगड येथे "@20 सपने हुए साकार" मध्ये मोदी सरकारच्या योजनांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब आणि दलित वर्गासाठी देवासमान असल्याचे म्हटले आहे. 

शेखावत म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या 8 वर्षांच्या शासन काळात ज्या लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे, त्यांना मोदी देवासमाव वाटतात. संमेलनात उपस्थित असलेले आदिवासी वर्गातून येणारे, अनुसूचित जमाती अथवा दलित समाजातील लोक मोदींना सन्मान मिळवून देणारे देव पुरुष म्हणून पाहू लागले असतील.

लोकांना वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली - 
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना पंतप्रधान मोदी वैज्ञानिक म्हणून अधिक वाटतात. तरुणांना स्टार्ट अपचे मार्गदर्शक तर ज्या लोकांना वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांच्यासाठी मोदी एक साथी आहेत. एकूणच काय तर, ज्या लोकानी मोदींना ज्या रुपात बघितले मोदी त्यांना तसेच दिसून आले. 

याशिवाय, मंत्री शेखावत यांनी आपल्या भाषणात, आपल्या मंत्रालयासह केंद्री सरकारच्या विविध योजनांचीही माहिती दिली. तसेच, या योजनांमुळे लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे, असेही शेखावत म्हणाले. यापूर्वी शेखावत यांनी 'मोदी @20 सपने हुए साकार' पुस्तकाची तुलना भगवद्गीतेसोबत केली होती. 
 

Web Title: pm narendra modi is like a god for dalit and tribal class says union minister gajendra singh shekhawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.