मोदींचे स्त्री दाक्षिण्य; पाया पडायला आलेल्या महिलेपुढे नतमस्तक झाले पंतप्रधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 12:13 PM2020-01-03T12:13:40+5:302020-01-03T12:18:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
तुमकूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मोदींनी गुरुवारी (2 जानेवारी) तुमकूरमध्ये सभा घेतली. या सभेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता (डिसेंबर 2019 ते मार्च 2020)चा शुभारंभ करण्यात आला. तसेच कर्नाटकला कृषी कर्मण पुरस्कार देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनूसार (पीएमओ) किसान सन्मान निधी योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा लाभ देशातील सहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून एकूण 12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
कृषी कर्मण पुरस्काराचं वितरण केल्यानंतर एक महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार करण्यासाठी खाली झुकली. तेवढ्यात तिला अडवत मोदी स्वत: झुकले आणि या महिलेच्या पाया पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या घटनेचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे.
हर मां और बेटी का सम्मान !
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) January 2, 2020
बेंगलुरू में जब एक महिला ने मोदी जी का चरण स्पर्श करना चाहा, तो उन्होंने न सिर्फ उसे ससम्मान रोका, बल्कि वे खुद महिला के चरण में झुक गए।
यह वीडियो यह बताने के लिए काफी है कि मोदी जी जो कहते हैं उसे अपने आचरण में उतारते भी हैं।@PMOIndiapic.twitter.com/sOU4SoYb7s
'प्रत्येक आई आणि मुलीचा सन्मान. बंगळूरूमध्ये जेव्हा महिला मोदींना नमस्कार करण्यासाठी झुकली. तेव्हा मोदींनी तिला अडवलं आणि स्वत: पाया पडण्यासाठी झुकले. हा व्हिडीओ पाहून मोदी जे बोलतात ते आचरणात उतरवतात' असं ट्वीट हर्षवर्धन यांनी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुमकूर येथे कृषी कर्मण पुरस्काराचं वितरण करण्यात आले. त्यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात येत होता. एका महिलेचे नावही पुरस्कारासाठी पुकारण्यात आले. महिला व्यासपीठावर आल्यानंतर मोदींनी या महिलेला हातजोडून अभिवादन केले. त्यानंतर तिला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. प्रशस्तीपत्रक घेतल्यानंतर ही महिला मोदींना नमस्कार करण्यासाठी खाली झुकली. मात्र त्यावेळी पंतप्रधान मोदींनी तिला अडवलं आणि स्वत: तिच्या पाया पडण्यासाठी झुकले.