राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशभर दंगली भडकवल्या जाऊ शकतात- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:18 PM2023-08-29T12:18:40+5:302023-08-29T12:19:13+5:30

"धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि निवडणुकीला सामोरे जायचं, हाच भाजपचा अजेंडा"

Pm Narendra Modi led BJP Govt may create riots ahead of Ram Mandir Inauguration says Sanjay Raut | राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशभर दंगली भडकवल्या जाऊ शकतात- संजय राऊत

राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशभर दंगली भडकवल्या जाऊ शकतात- संजय राऊत

googlenewsNext

Sanjay Raut vs Pm Narendra Modi BJP Govt: अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारणीचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारी २०२४ ला राम मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. काही दिवसांपूर्वी, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या मानसिकेतवर घणाघाती प्रहार केला होता. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी भाजपा सरकारकडून मोठा हल्ला केला जाऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर विधान केले आहे.

"जो राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवून आणू शकतो असे बोलले जाते किंवा सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्याचा वापर करतो, त्या लोकांबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. काश्मीरचे माजी राज्यपाल पुलवामा हल्ला घडवून आणला असं सांगत होते. गुजरात दंगलीबाबतही असाच काहीसा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे लोकांच्यात भीती निर्माण करण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळीही असं काही तरी घडवलं जाऊ शकतं. अयोध्येला मोठ्या संख्येने लोकांना बोलवण्यात येईल, विशेष रेल्वे सोडल्या जातील आणि त्यांच्यावर प्लॅनिंग करून दगडफेक केली जाऊ शकेल, त्यातूनच देशभर दंगडी भडकवल्या जाऊ शकतील अशी भिती किंवा अंदाज लोक व्यक्त करत आहेत," असे खळबळजनक विधान राऊतांनी केले.

'जायेगा तो मोदी'

“बाबरी अयोध्येचा मुद्दा आता संपलेला आहे. हा मुद्दा काढणारे मूर्ख आहेत. येत्या २०२४च्या निवडणुकीत 'आयेगा तो मोदी' नाही, 'जायेगा तो मोदी' अशी घोषणा दिली जाईल. लोकसभेमध्ये आमचा 19चा आकडा कायम राहील. उलट आणखी जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे. भाजपाकडे 2024च्या निवडणुकीसाठी कुठलाही अजेंडा नाही. म्हणूनच मूळ प्रश्नांना बगल देऊन धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि मग निवडणुकीला सामोरे जायचं, हा एकच अजेंडा भाजपकडे आहे", असेही संजय राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीच जिंकणार!

'इंडिया' आघाडीला कोणी काउंटर करू शकत नाही. आमची घोडदौड रोखणं कोणालाही शक्य नाही. कोणी कितीही आडवे आले, तरी ते करू शकणार नाही. येत्या निवडणुकीत इंडियाच जिंकेल. देशातील वातावरण आता बदलू लागले आहे. त्यामुळे आता भाजपा पराभव करून इंडिया आघाडीच विजयश्री मिळवेल," असे संजय राऊत म्हणाले.

Web Title: Pm Narendra Modi led BJP Govt may create riots ahead of Ram Mandir Inauguration says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.