PM Modi Mann Ki Baat: भारतात तयार झालेल्या वस्तूंना जगभरात मागणी, निर्यातीतही ऐतिहासिक वाढ; पंतप्रधानांनी सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 01:17 PM2022-03-27T13:17:47+5:302022-03-27T13:19:55+5:30
भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. पाचा राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. "भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे," असं ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार असल्याचंही सांगितलं. "आज संपूर्ण जगात योग आणि आयुर्वेदाप्रती कल वाढत आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका योग कार्यक्रमात ११४ देशांच्या नागरिकांनी भाग घेत एक जागतिक विक्रम स्थापन केला. आयुष उद्योगाची बाजारपेठ सतत विस्तारत आहे. सहा वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ २२ हजार कोटींच्या आसपास होती. आज आयुष उत्पादन उद्योग सुमारे एक लाख ४० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे," असंही ते म्हणाले.
Earlier, it was believed only big people could sell products to the Government but the Government eMarketplace Portal has changed this; it shows the spirit of a New India: PM Modi #MannKiBaatpic.twitter.com/dgUhtDiN9j
— ANI (@ANI) March 27, 2022
"अमृत सरोबत बांधले जाऊ शकतात"
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ अमृत सरोवर बांधले जाऊ शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. काही जुन्या तलावांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, काही नवीन बांधले जाऊ शकतात. या दिशेने तुम्ही नक्कीच काही प्रयत्न कराल याची मला खात्री आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
जलसंधारणावर भर
आपल्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदींनी जलसंधारणावर भर दिला. "मी अशा राज्यातून आलो आहे जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमध्ये या विहिरींना (Stepwells) वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात वावने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी संरक्षणासाठी 'जल मंदिर योजने'ने मोठी भूमिका बजावली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये अनेक विहिरंचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यामुळे या भागातील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली. तुम्ही स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारच्या मोहिमा चालवू शकता. देशातील अनेकांनी जलसंधारण हाच जीवनाचा एकमेव उद्देश बनवला आहे, याचा मला आनंद आहे," असंही मोदी म्हणाले.
निर्यात ४०० अब्ज डॉलर्सवर
एकेकाळी भारतातून निर्यातीचा आकडा १०० अब्ज, कधी १५० अब्ज होता, आज भारत ४०० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतात तयार उत्पादनांची मागणी जगभरात वाढत आहे असा याचा अर्थ आहे. दुसरे म्हणजे भारताची पुरवठा साखळी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. पूर्वी असं मानलं जात होतं की केवळ मोठे लोकच सरकारला उत्पादनं विकू शकतात, परंतु सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलनं हे चित्र बदलले आहे. त्यातून नव्या भारताची भावना दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
India has achieved the target of 400 billion dollar exports. This signifies India's capabilities and potential. It means that the demand for Indian goods is rising in the world: PM Narendra Modi in 'Mann Ki Baat' pic.twitter.com/LmKY8jfbDI
— ANI (@ANI) March 27, 2022
बाबा शिवानंद यांचा उल्लेख
कार्यक्रमात मोदींनी बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात तुम्ही बाबा शिवानंद यांना पाहिलं असेल, असं मोदी म्हणाले. १२६ वर्षे वय असतानाही त्यांची चपळता पाहून माझ्या प्रमाणेच सर्वांनाच आश्चर्य वाटले असेल आणि काही सेकंदातच ते नंदीमुद्रेत प्रणाम करू लागले. मी पण बाबा शिवानंदजींना नतमस्तक झालो, असंही मोदी म्हणाले.