पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 03:53 PM2024-08-15T15:53:55+5:302024-08-15T15:56:33+5:30

PM Modi Meet Olympics Contingent : या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी स्टार खेळाडू नीरज चोप्रा नरेंद्र मोदींना भेटू शकला नाही.

PM Narendra Modi meets the Indian contingent that participated in Paris Olympics 2024, at his residence. | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

PM Modi Meet Olympics Contingent : नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप नुकताच पार पडला. या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या भारताच्या खेळाडुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) भेट घेतली. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी खेळाडूंना संबोधित केले. यावेळी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पद जिंकणारा भारतीयहॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, कुस्तीपटू अमन सेहरावत, स्वप्नील कुसळे आणि सरबज्योत सिंग यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी स्टार खेळाडू नीरज चोप्रा नरेंद्र मोदींना भेटू शकला नाही. कारण, पॅरिस ऑलिम्पिकमधून तो अद्याप मायदेशी परतला नाही. नीरज चोप्रा उपचारासाठी जर्मनीला गेला आहे. दुसरीकडे, बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही वैयक्तिक कारणांमुळं भेटायला आली नाही. पीव्ही सिंधूला यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी करता आली नाही. ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकली नाही. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं सहा पदकं जिंकली आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचे नरेंद्र मोदी यांनीअभिनंदन केलं. तसंच, २०३६ चे ऑलिम्पिक भारतात व्हावं, यासाठी पूर्ण तयारी केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "मित्रांनो, भारताचं स्वप्न आहे की, २०३६ मध्ये होणारे ऑलिम्पिक भारताच्या भूमीवर व्हावं. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत आणि पुढे जात आहोत."

याचबरोबर, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथे उपस्थित ऑलिम्पिक विजेत्यांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज तिरंग्याच्या झेंड्याखाली ते तरुण आपल्यासोबत बसले आहेत, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवला आहे. १४० कोटी देशवासियांच्या वतीने मी माझ्या देशाच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. नवीन स्वप्न, नवीन संकल्प आणि प्रयत्नांसह नवीन ध्येयाकडे वाटचाल करू."

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं ५ कांस्य पदकं जिंकली 
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका रौप्य पदकाशिवाय भारताला ५ कांस्य पदकं मिळाली आहेत. 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलं. गेल्यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं. यावेळी तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. नेमबाज मनू भाकरनं २ कांस्यपदकं जिंकली. तिनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. याशिवाय तिनं सरबज्योत सिंगसोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. नेमबाज स्वप्नील कुसाळेनेही कांस्यपदक पटकावलं. तर पुरुष हॉकी संघ आणि कुस्तीपटू अमन सेहरावतनं कांस्यपदक जिंकलं.

Web Title: PM Narendra Modi meets the Indian contingent that participated in Paris Olympics 2024, at his residence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.