तीन दिवसांचा गुजरात दौरा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात केली पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 08:32 IST2025-03-03T08:30:32+5:302025-03-03T08:32:44+5:30
पंतप्रधान मोदी यांनी जामनगर जिल्ह्यातील वनतारा पशुसंवर्धन, संरक्षण व पुनर्वसन केंद्राला भेट दिली.

तीन दिवसांचा गुजरात दौरा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात केली पूजा
जामनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील प्रभास पाटण येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिराचे दर्शन घेत मोदींनी पूजा केली. तत्पूर्वी, सकाळी त्यांनी जामनगर जिल्ह्यातील वनतारा पशुसंवर्धन, संरक्षण व पुनर्वसन केंद्राला भेट दिली. मोदी गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
तीन हजार एकर क्षेत्रात पसरलेले वनतारा केंद्र रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी परिसरात आहे. वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचे कार्य या संरक्षण या केंद्रात केले जाते. गैरवापर व शोषण होण्यापासून वाचवलेल्या प्राण्यांना अभय देण्याबरोबर त्यांचे पुनर्वसन व आरोग्याची काळजी घेण्याचे काम येथे केले जाते. मोदी सोमवारी जंगल सफरीवर जाणार आहेत. जंगल सफरीवरून परतल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यप्राणी बोर्डाची बैठक होणार आहे. पंतप्रधान सासन येथील महिला वनकर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.