प्रचार संपताच मोदी केदारनाथाच्या चरणी; गुफेत ध्यान करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:03 AM2019-05-18T11:03:47+5:302019-05-18T11:16:09+5:30
पाच वर्षांतला चौथा केदारनाथ दौरा
रुद्रप्रयाग: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकेदारनाथाचं दर्शन घेतलं. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा केली. यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. मोदींचा उत्तराखंड दौरा दोन दिवसांचा आहे. यानंतर ते सोमवारी (19 मे) बद्रिनाथला जातील.
Prime Minister Narendra Modi offers prayers at Kedarnath temple. #Uttarakhandpic.twitter.com/uIm1TGLMEK
— ANI (@ANI) May 18, 2019
Visuals of Prime Minister Narendra Modi offering prayers at Kedarnath temple. #Uttarakhandpic.twitter.com/9dtnL0rX6I
— ANI (@ANI) May 18, 2019
आज सकाळी मोदी उत्तराखंडला पोहोचले. त्यानंतर तिथून ते केदारनाथमध्ये दाखल झाले. मोदींचा गेल्या पाच वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चरात विशेष पूजा केली. पुजाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि चंदनाचा टिळा लागला. त्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात बराच काळ साधना केली. मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घालत उपस्थित भाविकांना अभिवादनही केलं.
Prime Minister Narendra Modi reviews redevelopment projects in Kedarnath. #Uttarakhandpic.twitter.com/Jh0m5DwiKM
— ANI (@ANI) May 18, 2019
#WATCH Prime Minister Narendra Modi reviews redevelopment projects in Kedarnath. #Uttarakhandpic.twitter.com/cFMH9PqVyC
— ANI (@ANI) May 18, 2019