नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर; अटल पुलाचे होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:23 AM2022-08-27T10:23:33+5:302022-08-27T10:25:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असणार आहेत.

PM Narendra Modi on two-day Gujarat tour from today; Atal bridge will be inaugurated | नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर; अटल पुलाचे होणार उद्घाटन

नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर; अटल पुलाचे होणार उद्घाटन

googlenewsNext

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी अहमदाबादमधील साबरमती नदीवरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या अटल पुलाचे उद्घाटन करणार आहेत. 

पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सुझुकी कंपनीच्या ४० वर्षांच्या प्रवासानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय रविवार २८ ऑगस्ट रोजी ते कच्छ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते 'स्मृती वन'सह विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील.

Web Title: PM Narendra Modi on two-day Gujarat tour from today; Atal bridge will be inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.