PM मोदींचा डंका, पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते! मिळालं 76 टक्के अप्रूव्हल रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:57 PM2023-12-08T21:57:42+5:302023-12-08T21:58:13+5:30

महत्वाचे म्हणजे, पीएम मोदी यांची 2023 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली. हा सर्व्हे अमेरिकन कंपनी द मॉर्निंग कंसल्टने केला होता.

PM narendra Modi once again became the world's most popular leader It got 76 percent approval rating | PM मोदींचा डंका, पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते! मिळालं 76 टक्के अप्रूव्हल रेटिंग

PM मोदींचा डंका, पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते! मिळालं 76 टक्के अप्रूव्हल रेटिंग

पंतप्रधाननरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, नरेंद्र मोदी यांना तब्बल 76 टक्के रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीतील डेटाच्या आधारे जारी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे.

ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेझ मॅन्युअल, तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट, ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत. ही रेटिंग वेगवेगळ्या देशांतील प्रौढ लोकसंख्येच्या रेटिंगच्या आधारे काढली जाते. तसेच, प्रत्येक देशातील सॅम्पल साईज वेगळी असते. 

या रेटिंगमध्ये टॉप 7 मध्ये ना अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांचे नाव आहे, ना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे नाव आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही पीएम मोदींची लोकप्रियता टॉपवर होती. तेव्हाही दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती एलेन बर्सेटच होते. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन तेव्हा सातव्या क्रमांकावर होते. महत्वाचे म्हणजे, पीएम मोदी यांची 2023 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली. हा सर्व्हे अमेरिकन कंपनी द मॉर्निंग कंसल्टने केला होता.

Web Title: PM narendra Modi once again became the world's most popular leader It got 76 percent approval rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.