एक कुटुंब, एक भविष्य हा आमचा मंत्र, संपूर्ण जग आमच्यासाठी एक कुटुंब:पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 07:34 AM2023-05-22T07:34:11+5:302023-05-22T07:41:15+5:30
FIPIC शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पापुआ न्यू गिनी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी पॅसिफिक महासागरातील १४ देशांच्या परिषदेत सहभागी झाले होते, हे देश आकाराने लहान असले तरी सामरिकदृष्ट्या मोठे आहेत. आज मोदींनी पापुआ न्यू गिनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गव्हर्नर जनरल सर बॉब दादा यांच्याशी भेट घेऊन केली आहे. शिखर परिषदेत आपला मुद्दा मांडताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतासाठी संपूर्ण जग हे एका कुटुंबासारखे आहे. एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मुख्य मंत्र आहे. आपल्यासाठी संपूर्ण जग हे एका कुटुंबासारखे आहे. कोरोनाच्या काळात भारताने अनेक देशांना मदत केली.
मविआत ‘भाऊ’बंदकी! काँग्रेस, राष्ट्रवादीकडे ३६ ते ३८ जागा, ठाकरे गटाला १२? फॉर्म्युला मान्य होणार का?
भारत पापुआ न्यू गिनीचा विश्वासार्ह भागीदार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही आमच्या देशबांधवांना मदत करतो. यासोबतच त्यांनी सर्व देशांना सौर आघाडीत सहभागी होण्याचे आवाहनही केले. आम्ही तुमच्या अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि भारत विविधतेवर विश्वास ठेवतो. भारत सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिखर परिषदेत १४ देश सहभागी झाले आहेत.
शिखर परिषदेत कोरोनावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महामारीचा सर्वाधिक प्रभाव जागतिक दक्षिण देशांवर झाला आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, भूक, गरिबी आणि आरोग्याशी संबंधित आव्हाने पूर्वीपासूनच होती, आता इंधन, खत आणि फार्माबाबत नवीन समस्या निर्माण होत आहेत.
"तुम्ही भारताला विश्वासार्ह भागीदार मानू शकता. आम्ही आमचा अनुभव आणि क्षमता तुमच्याशी संकोच न करता देण्यास तयार आहोत. भारत बहुपक्षीयतेवर विश्वास ठेवतो आणि मुक्त, आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिकला समर्थन देतो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, G-20 च्या माध्यमातून भारत या शिखर परिषदेच्या माध्यमातून ग्लोबल साउथच्या चिंता, अपेक्षा आणि आकांक्षा जगासमोर पोचवण्याची आपली जबाबदारी मानतो. G-7 मध्येही माझा हा प्रयत्न राहिला आहे. जोपर्यंत हवामान बदलाचा प्रश्न आहे, भारताने या विषयावर एक लक्ष्य निश्चित केले आहे आणि त्यावर वेगाने कामही करत आहे.