Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाच्या पुजेत PM नरेंद्र मोदी तल्लीन, पियुष गोयल यांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 02:06 PM2022-09-01T14:06:51+5:302022-09-01T14:08:38+5:30

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी गणरायाची आरती केली.

PM Narendra Modi performs aarti and did Pooja of lord Ganesha at Piyush Goyal's home | Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाच्या पुजेत PM नरेंद्र मोदी तल्लीन, पियुष गोयल यांनी शेअर केला व्हिडिओ

Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाच्या पुजेत PM नरेंद्र मोदी तल्लीन, पियुष गोयल यांनी शेअर केला व्हिडिओ

googlenewsNext

Ganesh Chaturthi 2022: काल म्हणझेच 31 ऑगस्ट रोजी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे (Ganesh Chaturthu Festival) आगमन झाले. देशभरात गणपत्ती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेकांच्या घरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याही घरी बाप्पाचे आगमन झाले, विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी गोयल यांच्या घरातील बाप्पाची पुजा-आरती केली. 

पियुष गोयल यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात मोदी गोयल यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती करताना दिसत आहेत. यावेळी मोदी नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात दिसले. यावेळी मोदी नेहमीच्या कपड्यांऐवजी पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची धोती घातलेले दिसले. पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर 'गणपती बप्पा मोरया!' असे कॅप्शन दिले.

इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी यांनीही गोयल यांच्या घरी पुजा करतानाचे काही फोटो ट्विटरवर शेअऱ केले आहेत. तसेच, नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटर हँडलवर लिहिले, 'गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा. देवाचे आशिर्वाद आपल्या सर्वांवर राहोत.' यासोबतच मोदींनी संस्कृतमधील एक श्लोकही शेअर केला आहे.

Web Title: PM Narendra Modi performs aarti and did Pooja of lord Ganesha at Piyush Goyal's home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.