PM Narendra Modi: “योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:33 PM2021-10-25T14:33:50+5:302021-10-25T14:35:45+5:30

PM Narendra Modi: निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे मोदींनी म्हटले आहे.

pm narendra modi praise yogi adityanath govt during visit at varanasi and siddhartha nagar in up | PM Narendra Modi: “योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने

PM Narendra Modi: “योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने

googlenewsNext
ठळक मुद्देसंपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेटकर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळइतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या महिन्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश दौरा केला. सिद्धार्थनगर आणि वाराणसी येथील विविध विकासकामे तसेच २ हजार ३२९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक केले. योगी सरकार संवेदनशील असून, हजारो मुलांचे प्राण वाचवले, असे सांगत निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे म्हटले आहे. 

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. उत्तर प्रदेशातूनच देशासाठी मोठी आरोग्य योजना सुरू होत असून, या मोठ्या कामासाठी तुमचा आशिर्वाद घेऊन काशीला जाणार आहे. केंद्र आणि यूपीतील सरकारमधील कर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे. सिद्धार्थनगरने स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी यांच्या रूपाने एक समर्पित लोकप्रतिनिधी दिला, ज्यांच्या अथक परिश्रमाचा राष्ट्रासाठी उपयोग होत आहे. सिद्धार्थनगरच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव माधव प्रसाद त्रिपाठी नावावर ठेवणे ही त्यांच्या सेवेला खरी श्रद्धांजली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले

उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की, योगींनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. तेव्हा योगीजी मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आता लोकं पाहत आहेत योगींनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले. जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का, असा खोचक सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. 

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या आधीच्या सरकारने आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये बांधली होती. योगींच्या कार्यकाळात १६ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून, ३० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांवर वेगाने काम सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
 

Web Title: pm narendra modi praise yogi adityanath govt during visit at varanasi and siddhartha nagar in up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.