PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:52 AM2022-01-21T09:52:09+5:302022-01-21T09:53:43+5:30

PM Narendra Modi:मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 नेत्यांच्या यादीत मोदी अव्वलस्थानी तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सहाव्या क्रमांकावर आहेत.

PM Narendra Modi: Prime Minister Narendra Modi has once again become the most popular leader in the world | PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

googlenewsNext

नवी दिल्ली: पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जवळपास 71 टक्के रेटिंगसह आवडत्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव अव्वलस्थानी आहेत. दुसरीकडे जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 43 टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत जो बिडेन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांचा क्रमांक लागतो, ज्यांना 43 टक्के रेटिंग मिळाली आहे. तर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41 टक्के रेटिंग मिळाली आहे.

यापूर्वीही मोदी अव्वलस्थानी
नोव्हेंबर 2021 मध्येही जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर होते. वेबसाइट सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेते आणि देशाच्या नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.

अशी ठरते रेटिंग
लोकप्रिय नेत्यांची रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या सरासरीवर आधारित आहे. नमुन्यांचा आकार देशांनुसार बदलतो. याच वेबसाइटने मे 2020 मध्ये पंतप्रधान मोदींना 84 टक्के मंजुरीसह सर्वोच्च रेटिंग दिली होती. जी मे 2021 मध्ये 63 टक्क्यांवर आली. ताजी रेटिंग 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: PM Narendra Modi: Prime Minister Narendra Modi has once again become the most popular leader in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.