पंतप्रधान जयपूरला पोहोचण्यापूर्वीच अशोक गेहलोत नाराज, उत्तरात काय म्हणाले मोदी? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:41 AM2023-07-27T11:41:44+5:302023-07-27T11:42:58+5:30
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक असे ट्विट केले होते. ज्याला थेट पीएमओच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत रिप्लाय देण्यात आला आहे.
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानात राजकीय तयारीला सुरुवात झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वीच येथे राजकारणही सुरू झाले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक असे ट्विट केले होते. ज्याला थेट पीएमओच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत रिप्लाय देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले होते, पंतप्रधानांच्या कार्यक्रमातून त्यांचे 3 मिनिटांचे संबोधन हटविण्यात आले आहे. यामुळे ते भाषणाच्या माध्यमाने पंतप्रधानांचे स्वागत करू शकणार नाहीत. याला थेट पीएमओ कार्यालयाकून उत्तर मिळाले आहे. पीएमओने ट्विट करत उत्तर दिले आहे की, आपल्याला बोलावण्यात आले आहे, आपले अजूनही स्वागत आहे.
असे आहे प्रकरण -
अशोक गेहलोत यांनी ट्विट केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आज आपण राजस्थानात येत आहात. PMO ने कार्यक्रमातून माझे 3 मिनिटांचे भाषण हटवले आहे. यामुळे मी भाषणाच्या माध्यमाने आपले स्वागत करू शकणार नाही. यामुळे मी या ट्विटच्या माध्यमाने आपले राजस्थानात मनापासून स्वागत करतो. यावर पीएमओकरून ट्विट करण्यात आले आहे.
बोलावले होते, आपले स्वागत आहे -
गेहलोतांच्या ट्विटवर पीएमओने ट्विट करत म्हटले आहे, "प्रोटोकॉलअंतर्गत आम्ही आपल्याला निमंत्रण पाठवले होते आणि आपल्या भाषणासाठी वेळही देण्यात आला होता. मात्र आपल्या कार्यालयाने सांगितले की, आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वी झालेल्या दौऱ्यावेळीही आपल्याला नेहमीच बोलावण्यात आले आहे. आपण त्या सर्वच कार्यकमांना आला आहात.
Shri @ashokgehlot51 Ji,
— PMO India (@PMOIndia) July 27, 2023
In accordance with protocol, you have been duly invited and your speech was also slotted. But, your office said you will not be able to join.
During PM @narendramodi’s previous visits as well you have always been invited and you have also graced those… https://t.co/BHQkHCHJzQ
आपले स्वागत आहे -
आजही आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपले स्वागत आहे. आपले नाव सर्वांनाच माहीत आहे. विकास कामांच्या फलकावरही आपले नाव आहे. जर कुठल्याही प्रकारची शारीरिक अडचण नसेल, तर आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.