पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीट; पाहा काय आहे विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:25 PM2024-01-18T13:25:33+5:302024-01-18T13:27:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केलेल्या स्टॅम्प्सच्या पुस्तकात ६ स्टॅम्प्स आहेत. राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माँ शबरी यांच्यावरील टपाल तिकिटांचा समावेश आहे.

PM narendra Modi releases commemorative postage stamps on Ayodhya's Ram Temple | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीट; पाहा काय आहे विशेष

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीट; पाहा काय आहे विशेष

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे. दरम्यान, आता या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री रामजन्मभूमी मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. याशिवाय त्यांनी प्रभू राम यांच्यावर जगभरात प्रसिद्ध झालेल्या तिकीटांचे पुस्तकही लाँच केले आहे. टपाल तिकिटाच्या डिझाईनमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सूर्या, सरयू नदी आणि मंदिराभोवतीच्या मूर्तींचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जारी करण्यात आलेल्या स्टॅम्प्सच्या पुस्तकात ६ तिकिटांचा समावेश आहे. राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माँ शबरी यांच्यावरील टपाल तिकिटांचा समावेश आहे.

"भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर..."; अखिलेश यादव यांची टीका

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "पोस्टल स्टॅम्पचे कार्य आपल्या सर्वांना माहित आहे, पण पोस्टल स्टॅम्प आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावतात. टपाल तिकीट हे इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंग पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.

२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या गर्भगृहात रामाची मूर्ती ठेवण्यात आली आहे.

Web Title: PM narendra Modi releases commemorative postage stamps on Ayodhya's Ram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.