कैलाश खेर यांनी गायलं 'मनमोहक मोर निराला', पंतप्रधान मोदांनी शेअर केलं गाणं; 'ही' आहे गाण्याची 'खासियत'
By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 25, 2020 08:15 PM2020-09-25T20:15:56+5:302020-09-25T20:23:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गाणे शेअर केले आहे. कैलाश खेर यांनी गायलेल्या या गाण्यात, पंतप्रधान मोदींच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटो जोडले आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक गाणे शेअर केले आहे. या गाण्यात त्यांचे काही जुने फोटोही जोडण्यात आले आहेत. हे गाणे बॉलीवुड गायक कैलाश खेर यांनी गायले आहे. गाण्याचे बोल आहेत, 'मनमोहक मोर निराला'.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गाणे शेअर केले आहे. कैलाश खेर यांनी गायलेल्या या गाण्यात, पंतप्रधान मोदींच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटो जोडण्यात आले आहेत.
पंतप्रधा मोदींनी शेअर केलेले हे गाणे एकूण 3.52 मिनिटांचे आहे. या गाण्यात वापरण्यात आलेल्या फोटोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या जिवनाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कैलाश खेर यांनी जेवढ्या सुंदर अंदाजात हे गाणे गायले आहे, तेवढ्याच सुंदर अंदाजात या गाण्यात मोदींचे फोटोही जोडण्यात आले आहेत.
पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती -
यापूर्वी भारतीय जनसंघाचे जनक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, कोरोना काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली आहे. एवढेच नाही, तर अनेकांना कोरोनाची लागणही झाली आणि काही कार्यकर्त्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.
आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम
कृषी विधेयकावरून विरोधकांवर निशाणा -
आपल्या संबोधना पंतप्रधान मोदींनी कृषी विधेयकावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, गेल्या काही दिवसांत आपल्या सरकारने तरुण व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे शेतकऱ्यांच्या नावे अनेक घोषणा करण्यात आल्या. पण त्यांच्या घोषणा पोकळ राहिल्या. कृषी विधेयकांचा सर्वाधिक फायदा लहान शेतकर्यांना होईल.आता शेतकर्याची इच्छा आहे की, ते कोठेही धान्य विकू शकतील. जेथे शेतमालाला जास्त भाव मिळेल तेथे ते विकतील. यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सोप्या भाषेत शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले, ते आता त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत. हे लोक खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवत आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट
याचबरोबर, काही लोकांनी राष्ट्रहिताऐवजी स्वतःचे हित सर्वोच्च ठेवले आहे. शेतकर्यांना कायद्यात अडकवून ठेवले होते. यामुळे त्यांचे धान्य कोठेही विक्री करता आले नाही. आम्ही MSP मध्ये रेकॉर्ड वाढविला. आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यूपीए सरकारने शेतकऱ्यांना फक्त २० लाख कोटींचे कर्ज दिले होते, मात्र, आमच्या सरकारने ३५ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन