धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:24 IST2025-04-06T19:23:12+5:302025-04-06T19:24:23+5:30
मोदी श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे.

धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावरून पुन्हा भारतात परतले आहेत. ते श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे.
हा व्हडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे, "नुकतेच श्रीलंकेतून परतताना मला राम सेतूच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. आणि एक दिव्य संयोग म्हणजे, ज्या दिवशी आयोध्येत 'सूर्य तिलक' होत होता, त्याच दिवशी हे घडले. या दोन्ही दर्शनाने मी धन्य झालो. प्रभु श्री राम हे आपल्या सर्वांना जोडणारी एक शक्ती आहे. त्यांच्या आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहो..."
On the way back from Sri Lanka a short while ago, was blessed to have a Darshan of the Ram Setu. And, as a divine coincidence, it happened at the same time as the Surya Tilak was taking place in Ayodhya. Blessed to have the Darshan of both. Prabhu Shri Ram is a uniting force for… pic.twitter.com/W9lK1UgpmA
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2025
हिंदी महासागरातील हा राम सेतू प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या सैनिकांनी लंकेवर कूच करण्यासाठी बांधला होता. याच सेतूवरून ते लंकेत गेले होते आणि राक्षसांचा राजा असलेल्या रावणाचा वध करून त्यांनी माता सीता यांना मुक्त केले होते, असे भारतीय समाज मानतो. पंतप्रधान मोदी विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आणि रामनवमी निमित्त प्रार्थना करण्यासाठी तामिळनाडूत पोहोचले होते.
पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकल्पांना दाखवला हिरवा झेंडा -
खरेतर, पंतप्रधान मोदी श्रीलंका आणि थायलंड दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा 3 एप्रिलला सुरू झाला होता. पंतप्रधान मोदी सर्वप्रथम बँकॉक येथे आयोजित बिम्सटेक परिषदेत सहभागी झाले. यानंतर ते श्रीलंकेला गेले. येथे त्यांनी अनेक प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान त्यांनी महाबोधी मंदिरातही दर्शन घेतले. यानंतर ते रविवारीच श्रीलंकेहून तामिळनाडूला परतत असताना त्यांना राम सेतूचे दर्शन घडले.