PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:40 AM2023-10-26T10:40:56+5:302023-10-26T10:41:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे.

PM narendra Modi should also lay the foundation stone of the mosque Muslim community appeals to the Prime Minister | PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला, अयोध्येतील राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात श्री रामलला सरकारची प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. यासाठी श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधानांना अधिकृत निमंत्रणही देण्यात आले आहे. यातच, पंतप्रधान मोदींच्या या अयोध्या दौऱ्यापूर्वीच, त्यांनी नव्या मशिदीचेही भूमीपूजन करावे, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. यासंदर्भात बोलताना इंडियन मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल अन्सारी म्हणाले, पंतप्रधान एका शुभ मुहूर्तावर अयोध्येत येत आहेत. त्यांना मशिदीचे काम सुरू करावे, अशी आम्ही त्यांना विनंती करतो. ही आमची मनापासून इच्छा आहे.

यासंदर्भात, इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नजमुल हसन गनी म्हटले, सर्वोच्च न्यायालयाकडून धन्नीपूर येथे मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्यात आली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येतच आहे, तर त्यांनी ऑल इंडिया इमाम संघठनेचे अध्यक्ष मौलाना डॉ. उमेर इलियासी आणि जामा मशीद दिल्लीचे  इमाम अहमद बुखारी यांनाही सोबत आणावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सरकारकडून सोहावलमधील धन्नीपूर येथे देण्यात आलेल्या जमिनीवर मशिदीच्या बांधकामाचे भूमिपूजन करावे.

राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला २५०० दिग्गज उपस्थित राहणार -
जगभरातील भारतीयांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले असल्याने भव्य आणि दिव्य सोहळ्याची तयारी सुरू आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणातून अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख केला होता. आता, राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह २५०० दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.

 

Web Title: PM narendra Modi should also lay the foundation stone of the mosque Muslim community appeals to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.