वारशाचा विकास, विकासाचा वारसा निर्माण करणे महत्त्वाचे; PM मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 06:35 AM2024-07-29T06:35:12+5:302024-07-29T06:35:44+5:30
पंतप्रधान मोदी भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारांनी लोककल्याणासाठी समन्वित आणि मजबूत प्रयत्न केल्यास ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होऊ शकते. विकसित भारत या संकल्पनेत वारसा विकसित करणे आणि विकासाचा वारसा निर्माण करणे याला विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सुशासन कक्षाचे निमंत्रक विनय सहस्रबुद्धे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार येथे दोन दिवसीय बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करत होते.
मोदींनी देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या सरकारच्या अजेंड्याबद्दल तपशीलवार चर्चा केली आणि कल्याणकारी उपायांमध्ये लोकसहभागाच्या महत्त्वावर भर दिला. तसेच सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या वापरावर भर दिला.