'मोदी है, मौका लिजिए'; भाषणाच्या शेवटच्या वाक्यावर नरेंद्र मोदींचा खणखणीत 'चौका'
By बाळकृष्ण परब | Published: February 8, 2021 12:36 PM2021-02-08T12:36:24+5:302021-02-08T12:38:17+5:30
Narendra Modi News : पंतप्रधानांनी कोरोनाकाळातील देशातील व्यवस्थापन आणि शेतकरी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना विरोधकांना जोरदार टोले लगावले.
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाकाळातील देशातील व्यवस्थापन आणि शेतकरी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना विरोधकांना जोरदार टोले लगावले. तसेच संपूर्ण भाषणानंतर अखेरच्या वाक्यात सतत टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार चिमटाही काढला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना मोदींनी सुरुवातीला कोरोनाकाळातील देशाची स्थिती आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांना मोदींनी प्रसंगी प्रत्युत्तर देत तर कधी विरोधकांचीच आधीची मते दाखले म्हणून देत टोले लगावले. तसेच शेतकरी आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या हमीभावाबाबतही सभागृहात स्पष्टीकरण देतात हमीभाव कायम राहील, अशी घोषणा केली.
#WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha to the Motion of Thanks on the President’s Address.(Source: Rajya Sabha TV) https://t.co/FkIpRmd9kN
— ANI (@ANI) February 8, 2021
भाषणाच्या शेवटी मोदींनी सातत्याने टीका करणाऱ्या टीकाकारांनाही जोरदार चिमटा काढला. यावेळी संसदेत चांगली चर्चा झाली. माझ्यावरही टीका झाली. खूप काही बोललं गेलं. पण त्यानिमित्ताने मी तुमच्या उपयोगाला आलो, याचं समाधान वाटतं. कोरोनाकाळात सारे घरात होते. त्यामुळे निर्माण झालेला ताण, राग इथे मोकळा झाला असेल. आता तुमच्या घरातील वातावरणात चांगलं राहील. अशीच नेहमी चर्चा करत राहा. मोदी है मौका लिजिए, असे मोदी म्हणाले.
मोदींनी विरोधकांना फटकारले; म्हणाले, विरोध करण्यासाठी खूप मुद्दे, विरोध झाला पाहिजे, पण....