कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 01:11 PM2021-09-17T13:11:08+5:302021-09-17T13:13:55+5:30

यावेळी पंतप्रधान मोदींनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरब, इजिप्त आणि कतार यांचा SCO मध्ये समावेश झाल्याबद्दल स्वागतही केले. नव्या सदस्यांमुळे आपला ग्रुप आणखी मजबूत झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

PM Narendra Modi speech in sco summit Tajikistan Commented on Afghanistan Taliban bigotry | कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

Next

नवी दिल्ली - आपल्या भागासाठी कट्टरता हे सर्वात मोठे आव्हान आहे. नुकतेच अफगाणिस्तानात जे घडले, ते याचेच एक मोठे उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) देशांच्या बैठकीला संबोधित करत होते. यावेळी ही बैठक ताजिकिस्तानमधील दुशाम्बे येथे आयोजित करण्यात आली आहे. (PM Narendra Modi speech in sco summit Tajikistan Commented on Afghanistan Taliban bigotry)

यावेळी पंतप्रधान मोदींनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरब, इजिप्त आणि कतार यांचा SCO मध्ये समावेश झाल्याबद्दल स्वागतही केले. नव्या सदस्यांमुळे आपला ग्रुप आणखी मजबूत झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

'कट्टरता जगासमोरील मोठे आव्हान' -
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान शांतता आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे, अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एससीओ शिखर परिषदाने धर्मांधतेचा अथवा कट्टरतेला सामोरे जाण्यासाठी पावले उचलायला हवीत, इस्लामशी संबंधित सर्व संस्थांशी संपर्क साधून पुढे काम करायला हवे.

मोदींचा बर्थडे... 21 दिवस साजरा होणार, 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमातून लोकसेवा
 

भारताने प्रस्तावित केलेल्या कॅलेंडरवर काम व्हायला हवे. प्रादेशिक सुरक्षिततेसाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी कट्टरतावाद्यांशी लढणे अत्यंत आवश्यक आहे. याच बरोबर, विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याला भागधारक बनावे लागेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

Web Title: PM Narendra Modi speech in sco summit Tajikistan Commented on Afghanistan Taliban bigotry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.