लोकसभा निवडणुकीचे शेवटचे ३ दिवस पंतप्रधान मोदींचा वाराणसीत मुक्काम, १४ जागांसाठी प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 08:04 AM2024-05-17T08:04:53+5:302024-05-17T08:05:56+5:30
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील १४ जागांसाठी ते वाराणसीतूनच प्रचार करतील.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचाराचे शेवटचे तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदीवाराणसीत तळ ठोकून आसपासच्या मतदारसंघांसाठी जोर लावतील. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील १४ जागांसाठी ते वाराणसीतूनच प्रचार करतील.
दि. २५ मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान पूर्ण होताच मोदी पूर्वांचलच्या १४ मतदारसंघांतील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी २८ ते ३० मेदरम्यान वाराणसीत तळ ठोकू शकतात. वाराणसी हा त्यांचा मतदारसंघ आहे. १ जूनला शेवटच्या आणि सातव्या टप्प्याचे मतदान होईल. या टप्प्यात वाराणसी, चंदौली, भदोईपासून गोरखपूरपर्यंतच्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मोदी यांच्याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शाह हे सातव्या टप्प्यातील मतदानासाठी वाराणसीत तळ ठोकतील.