Coronavirus PM Narendra Modi : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 08:19 PM2022-04-24T20:19:35+5:302022-04-24T20:21:11+5:30
सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होण्याची शक्यता.
देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्रानं कोरोनासंदर्भातील अनेक निर्बंध हटवले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या थोडी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रानं पुन्हा एकदा कंबर कसली असून राज्यांना पत्रही लिहिलं होतं. दरम्यान, आता कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे ही बैठक पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. कोरोनासंदर्भातील या आढावा बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही सामील होण्याची शक्यता आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क आणि अन्य उपाययोजनांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं.
A meeting to discuss the Covid situation in the country has been convened at 12 pm on Wednesday, April 27 via video conferencing. The meeting will be chaired by Prime Minister Narendra Modi: Official Sources
— ANI (@ANI) April 24, 2022
(File Pic) pic.twitter.com/gTWsfjV0kF
रविवारी देशात कोरोनाच्या २५९३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४.३०,५७,५४५ वर पोहोचली आहे. तर देशात १५,८७३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोनामुळे ४४ लोकांचा मृत्यू झाला.