नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 01:07 PM2023-07-26T13:07:41+5:302023-07-26T13:08:40+5:30

आयटीपीओ कॉम्प्लेक्समध्ये हवन आणि पूजेनंतर नरेंद्र मोदींनी कामगारांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

pm narendra modi to inaugurate revamped itpo complex in delhi today participated in a havan puja | नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन!

नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन!

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित केलेले आयटीपीओ (ITPO) कॉम्प्लेक्स सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6.30 वाजता आयटीपीओ कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करणार आहेत. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी कॉम्प्लेक्समध्ये पूजा केली. तसेच, आयटीपीओ कॉम्प्लेक्समध्ये हवन आणि पूजेनंतर नरेंद्र मोदींनी कामगारांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

आयटीपीओ कॉम्प्लेक्स सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीसाठी बनवण्यात आले आहे. हे सुमारे 123 एकरमध्ये पसरलेले आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) च्या मालकीच्या जागेच्या पुनर्विकासाची जबाबदारी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या बांधकाम कंपनीला देण्यात आली होती. याशिवाय, या कॉम्प्लेक्सची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत.  

जवळपास 2700 कोटी रुपयांचा खर्च करून आयटीपीओ कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे. हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे एमआयसीई (MICE-Meting, Incentives, Conferences and Exhibitions) आहे. या लेव्हल थ्री कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 7000 हून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. या कॉम्प्लेक्समध्ये पाहुण्यांच्या सोयीसाठी 5500 हून अधिक पार्किंगची जागा तयार करण्यात आली असून त्यामुळे वाहने पार्क करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

व्यवसाय आणि नेटवर्किंगसाठी उत्तम व्यासपीठ!
कॉम्प्लेक्समध्ये जागतिक स्तरावर मेगा परिषद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातील. यामध्ये उत्पादने, नवकल्पना आणि विचारांचे प्रदर्शित करण्यासाठी सात नवीन  प्रदर्शनी हॉल देखील आहेत. हे अत्याधुनिक हॉल प्रदर्शक आणि कंपन्यांना आपल्या प्रेक्षकांशी संलग्न राहण्यासाठी, व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करेल.

कॉम्प्लेक्सचे सौंदर्य मन मोहून टाकेल
G20 शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या या कॉम्प्लेक्सचे सौंदर्य असे आहे की, जो कोणी पाहील तो आनंदित होईल. कॉम्प्लेक्सच्या गुणवत्तेमुळे, जगातील 10 सर्वात मोठ्या प्रदर्शन आणि अधिवेशन संकुलांच्या यादीत या कॉम्प्लेक्सचा समावेश करण्यात आला आहे. हे IECC कॉम्प्लेक्स जर्मनीमधील हॅनोव्हर एक्झिबिशन सेंटर आणि शांघायमधील राष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन सेंटरला टक्कर देऊ शकते.
 

Web Title: pm narendra modi to inaugurate revamped itpo complex in delhi today participated in a havan puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.