धनत्रयोदशीला रोजगार मेळावा; नरेंद्र मोदी आज 75000 तरुणांना देणार नोकरीची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 08:10 AM2022-10-22T08:10:41+5:302022-10-22T08:11:12+5:30

Narendra Modi : या मोहिमेला 'रोजगार मेळा' असे नाव देण्यात आले आहे.

pm narendra modi to launch rozgar mela recruitment drive for 10 lakh personnel today | धनत्रयोदशीला रोजगार मेळावा; नरेंद्र मोदी आज 75000 तरुणांना देणार नोकरीची भेट!

धनत्रयोदशीला रोजगार मेळावा; नरेंद्र मोदी आज 75000 तरुणांना देणार नोकरीची भेट!

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात यंदाची दिवाळी रोजगाराभिमुख असणार आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदीनोकरी आणि रोजगाराची भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10 लाख कर्मचार्‍यांसाठी नियुक्ती मोहीम सुरू करणार आहेत. या मोहिमेला 'रोजगार मेळा' असे नाव देण्यात आले आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्याने भरती झालेल्या 75,000 तरुणांना ऑफर लेटर म्हणजेच नियुक्तीपत्रे देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम व्हर्च्युअल असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधितही करतील.

पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांना मिशन मोडद्वारे 10 लाख पदांची भरती करण्याचे निर्देश दिले होते. सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले होते.

38 मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त्या
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार सर्व मंत्रालये आणि विभाग मंजूर पदांवरील विद्यमान रिक्त पदे भरण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहेत. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी भारत सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त केले जातील. नव्याने भरती झालेले कर्मचारी विविध स्तरावर (उदाहरणार्थ, गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क.) सरकारमध्ये रुजू होतील, असे पीएमओने सांगितले. 

कोणत्या विभागामध्ये नियुक्त्या?
ज्या पदांसाठी नियुक्त्या केल्या जात आहेत, त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस आणि इतरांचा समावेश आहे, असे पीएमओने सांगितले. तसेच, या नियुक्त्या मंत्रालये आणि विभाग स्वतःहून किंवा मिशन मोडमध्ये नियुक्त करणार्‍या एजन्सीद्वारे करत आहेत. या एजन्सींमध्ये संघ लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग आणि रेल्वे भरती मंडळाचा समावेश आहे. जलद भरतीसाठी निवड प्रक्रिया सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम बनवण्यात आली आहे.

Web Title: pm narendra modi to launch rozgar mela recruitment drive for 10 lakh personnel today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.